ताज्या घडामोडी

मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे आश्विनी भोसले दिले दाखवून,

आश्विनी भोसले ह्मा तरुणींनी आपल्या कामगिरीच्या जोरावर उमटवला वेगळा ठसा.

खालापूर – समाधान दिसले

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला नाही. आपल्या समोर अशी अनेक उदाहरणे असतील जिथे पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिलांनी यश मिळवले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आता माहिला मागे राहिल्या नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशीच ग्रामीण गावातील आश्विनी संजय भोसले ह्मा तरुणींनी आपल्या कौशल्याच्या व हुशारीच्या जोरावर वेगळा ठसा उमटवल्याने या तरुणींच्या कामगिरीचे सर्वाना कौतुक वाटत आहे. आश्विनी भोसले ही खालापूर एक्सप्रेस हायवे शैवरील फुड वे मॉल मध्ये उच्च पदावर कार्यरत असून जवळपास 150 हून अधिक कामगारांचे व्यवस्थापन म्हणून काम करीत आपली योग्य रितीने कामगिरी चोख बजावत असल्याने आश्विनी संजय भोसले हिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हल्लीची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आपल्या भारताची परंपरा आणि संस्कृती जपत आताच्या महिला घराबाहेर राहून कामदेखील करतात. चूल आणि मुल या संकल्पनेतून बाहेर येत आता महिला यशाच्या उंच शिखरावर आहेत. पण यात जुन्या परंपरा आणि रूढींना विसरून काही मुलीं आपल्या कौशल्यांच्या जोरावर समाजात नाव रोशन करताना सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळत असून अशीच ग्रामीण खेडे गावातील आश्विनी भोसले या तरुणीनीने ग्रामीण भागातून शिक्षणाचे धडे घेत उच्च शिक्षण घेत आपल्या कौशल्य हुशारीच्या जोरावर नाव रोशन करताना पाहायला मिळत आहे. आश्विनी ही तरुणांनी नामंकित फुड वे मॉलवर व्यवस्थापक म्हणून काम करीत असून जवळपास 150 हून अधिक कामगारांवर नियंत्रण ठेवित त्याच्याकडून काम करवून घेत आहे. त्यामुळे सर्वाना आश्विनीच्या कामाचे कौतुक वाटत आहेत.

याबाबत आश्विनी भोसले हीने मत व्यक्त करताना म्हणाल्या की, आजच्या युगात मुली कोणत्या क्षेत्रात मागे नसून मुलींचे प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व पाहायला आहे. तर मुलींनी आपली आवड निवड जोपासून आपल्या कौशल्याच्या जोरावर यश संपादन करीत आई – वडीलांचे नाव रोशन करावे, जेणेकरून आई – वडीलांना आपला सार्थ अभिमान वाटला पाहिजे असे आश्विनींने मत व्यक्त केले.ङ

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close