ताज्या घडामोडी

मुंबई आग्रा महामार्ग टोल नाक्यावर ताफा थांबवून मंत्री छगन भुजबळ यांनी वाहतूक केली सुरळीत*

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या

*मुंबई आग्रा महामार्ग टोल नाक्यावर ताफा थांबवून मंत्री छगन भुजबळ यांनी वाहतूक केली सुरळीत*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – नाताळच्या सुट्ट्या आणि वीक एन्ड असल्याने मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे घोटी टोल नाक्यावर आज दोन किलोमीटर अंतरापर्यंत ट्राफिक जाम झाली होती. यावेळी मुंबईहुन नाशिकच्या दिशेने येत असतांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या. यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत मंत्री छगन भुजबळ हे घोटी टोल नाका येथे थांबून त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला.तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close