क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खालापुरात मनसेत इनकमिंग, माडप येथील तरुणाई मनसेत दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तरुणाई आकर्षित करणारा पक्ष

खालापुरात मनसेत इनकमिंग, माडप येथील तरुणाई मनसेत दाखल

खालापूर – समाधान दिसले

सध्या कोरोना व्हायरस या महामारीचे संकट असताना राजकीय बार काही उडायचे थांबत नाहीत. खालापुरात माडप येथील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज साहेब ठाकरे यांच्या कार्याला प्रभावित होऊन मनसेमध्ये प्रवेश केल्याने या प्रवेशामुळे मनसेला अधिक बळकटी मिळणार असल्याची प्रतिक्रिया मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष जे.पी.पाटील यांनी या प्रवेशा वेळी दिली या पुढे मनसेत इंकमिंग सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तरुणाई आकर्षित करणारा पक्ष पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे महाराष्ट्राच्या प्रत्येक संदर्भात भाष्य करताना महाराष्ट्राच्या भल्याचे सांगत असल्याने जनसामान्यांचे आवडते नेतृत्व असल्याने त्याच बरोबर आक्रमक नेतृत्व म्हणून राज साहेबांची ओळख आहे. व महाराष्ट्रात स्थानिक भरती साठी मनसे अग्रक्रमाने पुढे राहत असल्याने राजसाहेबांच्या कार्यप्रणालीवर माडप येथील प्रशांत पाटील यांनी आपल्या सहकारी वर्गासह जिल्हा उपाध्यक्ष जे.पी.दादा. पाटील यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला यावेळी तालुका उपाध्यक्ष अविनाश देशमुख, बाळा दर्गे, महेश पिंगळे, सतीश घोडविंदे, सिद्धेश घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माडप परिसरात मनसेला वाढविण्यासाठी व तरुणाईला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया प्रशांत पाटील यांनी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close