ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर

जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर

येवला( ) येथील सेवाभावी संस्था संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समिती येवला यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कार” साठी १८ पुरस्कार्थीची नांवे जाहीर करण्यात आली. संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीचे अध्यक्ष मुकेश लचके व उपाध्यक्ष राम तुपसाखरे, चिटणीस पुरूषोत्तम रहाणे यांनी नांवे जाहीर केली. रविवार दि.२७/१२/२०२० रोजी सायं, ४.०० वा. संत नामदेव विठ्ठल मंदिर सभागृह शिपी गल्ली येवला येथे पुरस्कार वितरण सोहळा होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोमनाथ हाबडे भूषविणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व कविवर्य श्री. नंदनजी रहाणे (भगुर) यांना विषेश निमंत्रित म्हणून आमंत्रित केले गेले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. बलरामसिंग संधु प्रधान, गुरुद्वारा प्रबंधन कमिटी येवला यांचे हस्ते होणार आहे. दिप प्रज्वलन, प्रतिमा पुजन मान्यवरांच्या हस्ते होईल.

जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कार सन २०२०” अंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पुढील व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय उत्कृष्ठ स्वयंसेवी संस्था गौरव पुरस्कार : धडपड मंच अध्यक्ष श्री. प्रभाकर झळके सर (येवला), धार्मिक क्षेत्र : ह.भ.प.निवृत्ती चव्हाण (ठाणगांव) व श्री. दत्तात्रय जाधव (येवला), सामाजिक क्षेत्र : श्री. सतिष भांबारे (नाशिक), श्री. शाम सारंगधर (श्रीरामपुर), श्री. अरविंद टापसे (लासलगांव), श्री. महेश काबरा (येवला), शैक्षणिक क्षेत्र: श्री. कुणाल दराडे (येवला), श्री. प्रविण बनकर (अंगणगांव), श्री. दत्तात्रय नागडेकर (येवला), कलाक्षेत्र : श्री. चेतन बेदडे (मोखडा), श्री. श्रीकांत खंदारे (येवला), समाज प्रबोधन क्षेत्र : श्री. अजय सोनवणे (प्रतिनिधी ABP माझा मनमाड), श्री. संतोष विंचू (प्रतिनिधी दै.सकाळ येवला). श्री. चेतन कोळस (प्रतिनिधी झी २४ तास येवला), व्यसनमुक्ती क्षेत्र : श्री. संजय (बापु) कुलकर्णी (सावरगांव), आरोग्य क्षेत्र : श्री. किरण वाटारे (नाशिक), उद्योग क्षेत्र : श्री. विकास काकडे (मनमाड) यांचा समावे आहे.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष श्री. बंडु क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप कोळी श्री. बी.आर.लॉढे स्विय सहाय्यक मा.भुजबळ साहेब, श्री. अरविंद तुपसाखरे, श्री. धनंजय कुलकर्णी, श्री. नारायण मामा शिंदे, श्री. भोलाशेठ लोणारी, श्री. गणेश शिंदे, श्री. किशोर सोनवणे, श्री. जयवंत खांबेकर, श्री. सुहास भांबारे आदिंसह अनेक मान्यवर हस्ती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष मुकेश लचके, उपाध्यक्ष राम तुपसाखरे, चिटणीस पुरूषोत्तम रहाणे, राजेंद्र कल्याणकर, पांडुरंग खंदारे, राजेंद्र गणोरे, कवित माळवे, अमोल लचके, तुषार भांबारे तसेच मार्गदर्शक कमिटी सदस्य कैलास बकरे, रविंद्र करमासे (पत्रकार), संदिप लचके, बळीराम शिंदे, अरूण गायकवाड, मधुसूदन शिंदे, अरूण लचके, अंड. अमित हाबडे व सर्व कार्यकारी सदस्य यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close