ताज्या घडामोडी

प्रत्येक सण शेतीशी निगडित असून शेती ही संस्कृती आहे- जिल्हाधिकारी निधी चौधरी

प्रत्येक सण शेतीशी निगडित असून शेती ही संस्कृती आहे- जिल्हाधिकारी निधी चौधरी

खालापूर – समाधान दिसले

शेती आपला अविभाज्य घटक असून या माध्यमातून तरुण वर्गांने शेतीकडे वळले पाहिजे. 24 डिसेंबर रोजी चौक वांवढळ या ठिकाणी असलेले जागा सोमाणी फार्म हाऊस यांनी केळी लागवडसाठी येथील तरुण वर्गांना दिल्यामुळे एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. यामुळे मला त्यांचा अभिमान वाटत आहे. केळी आपल्या कोकणातून हद्दपार होत असतांना तरुण वर्गांनी हे करुन दाखविले, की आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर शेतीमधून उत्पन्न घेवू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला सण येत असतोच मात्र सण ही शेतीशी निगडीत असून. शेती ही संस्कृती आहे, असे प्रतिसाद जिल्हाधिकारी रायगड आलिबाग निधी चौधरी यांनी चौक वांवढळ येथे सोमाणी फॉर्म हाउस येथे केळी लागवड केली असून त्या पाहणी करण्यासाठी आल्या असतांना उपस्थित शेतकरी वर्गांशी बोलतांना म्हणाल्या.

यावेळी सोमाणी फॉर्म हाउस येथे लागवड करण्यात आलेल्या केळ्यांची पाहणी करुन केळी पिकविण्यासाठी असलेले रॅपिंग चॅंबर चे तसेच सुखकर्ता ॲग्रो फार्मस प्रोडुसर कंपनी लि.या नाम फलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार खालापूर इरेश चप्पलवार, उप विभागीय अधिकारी वैशाली परदेशी, उप पोलीस निरीक्षक राजेंद्र मांडे, सहा. निबंधक सह संस्था खालापुर बाळ परब, तालुका कृषी उप विभागीय अधिकारी अर्चना नारनवर – सुळ, कृषी सहाय्यक नितिन महाडीक, शिवाजी राठोड, ग्राम पंचायत वांवढळ सरपंच खडके, सरपंच ग्रूप ग्राम पंचायत वावर्ले वैशाली दरेकर तसेच सत्कार मुर्ती जयंती भाई सोमाणी, चिंतामण कदम अदि उपस्थित होते.

यावेळी निधी चौधरी पुढे म्हणाल्या की प्रत्येक शेतकरी वर्गांनी एक विचार करा की पिकेल तेच विकेल ही संकल्पना रुजली जावी. आज शेती कमी झाली असून कामगार संख्या वाढत आहेत. विशेष म्हणजे तरूण वर्ग याकडे पाठ फिरवित आहे. मात्र कृषीमुळे जग सुंदर बनते म्हणून प्रत्येकाने शेती मध्ये स्वताला झोकून दिले पाहिजे. केळी लागवड केल्यास पाच ते सहा महिन्यात उत्पन्न देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गांनी एकत्र ऐवून नविन काही प्रयोग करणे गरजेचे आहे. यामुळे मला सुद्धा शेताच्या बांधावर जावून पाहण्यास खूप आनंद वाटेल. आज महिला वर्ग शेतीच्या कामामध्ये पुढाकार असतो. मात्र पुरुष वर्ग सुद्धा शेतीच्या कामामध्ये पुढाकार घेत आहे. त्याच बरोबर महिला वर्गांनी स्थापन केलेल्या संस्थेला सुद्धा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सुखकर्ता सुखकर्ता शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या. अध्यक्ष सुभाष मुंढे, उपाध्यक्ष प्रमोद पवार, सचिव बाळकृष्ण लभडे,’खजिनदार अविनाश आमले, सदस्य अविराज बुरूमकर, समिर पिंगळे, दिनेश शिंदे, सुनिल कुरुंगले, भरत साळुंखे, राजेंद्र मोरे, संतोष दळवी, लक्ष्मण मेंगाळ, जयंतीभाई सोमाणे, रुपेश लभडे तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते.

चौकट –
कोकणात केळी अल्प प्रमाणात होत असल्यामुळे मी स्वता जागेवर हा प्रयोग केला आणी काही महिन्यात मला उत्तम प्रकारे केळी लागवड करुन मिळाली यामुळे त्यांची विक्रीतून नफा मिळाला या माध्यमातून लागवड कशी केली पाहिजे त्यांची निगा, खतपाणी या सर्व बाबीचा आभ्यास करून चौक वांवढळ येथे केली लागवड करण्यात आली आहे.
सुभाष मुंढे
(सुखकर्ता शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या.अध्यक्ष)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close