ताज्या घडामोडी

व्यसनाधीन भावाचा सख्ख्या भावाकडून खून

व्यसनाधीन भावाचा

सख्ख्या भावाकडून खून

येवला । दि. २२ प्रतिनिधी प्रशांत 

येवला तालुक्यातील नगरसूल येथील व्यसनाधीन भावाचा दोघा सख्ख्या भावानेच खून केल्याचा प्रकार तालुका पोलिसांनी तब्बल पावणे चार महिन्यांनी छडा लावत उघडकीस आणला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या या माहितीनुसार नगरसूल शिवारातील नांदगाव रोडवर सोमनाथ आसाराम बरे हे भीमराज, किरण व अमोल या तिघा मुलांसह एकत्रित कुटु बात राहत होते यातील सर्वात लहान मुलगा मयत अमोल वय १८ यास दारूचे व्यसन होते . त्याच्या या व्यसनामुळे समाजात बदनामी होत असल्याचे सांगत वडील सोमनाथ यांनी आपल्या दोघा मोठ्या मुलांना अमोल याच्याविरोधात चिथावणी दिली.त्यातून संशयित भीमराज व किरण या दोघा भावांनी ३० ऑगस्टला रात्री ९ वाजेच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने अमोलचा गळा आवळून खून के ला.त्यानंतर पुरावा नष्ट

मृतदेह गाडीतून घेऊन जात नगर जिल्ह्यातील मळे गाव येथील वाहत्या गोदावरी नदी पात्रात त्याच्या पोटाला दगड बांधून फेकून दिला. त्यानंतर तब्बल पावणेचार महिन्यानंतर येवला तालुका पोलिसांनी या प्रकारचा छड़ा लावला आहे. तालुका पोलिसांनी या ‘प्रकरणी वडील सोमनाथ वरे (४८) यांच्यासह त्यांची दोन मुले भिमराज वरे (२४) व किरण वरे (२२) या तिघांना अटक केली आहे. मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवे व तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, व पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोरे करण्यासाठी अमोल यांचा यांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close