ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्यात रात्रीची संचारबंदी लागू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कपील कट्यारे नाशिक प्रतिनीधी

महाराष्ट्र राज्यात रात्रीची संचारबंदी लागू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* मुंबई – ख्रिसमस आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी नागरिकांना संयम पाळावा लागणार आहे. कारण रात्री 11 नंतर नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहेब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close