ताज्या घडामोडी

माधवनगर मध्ये पत्रकारास जीव मारण्याची धमकी सचिन पाटील याच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी
महेश पवार
माधवनगर

माधवनगर मध्ये पत्रकारास जीव मारण्याची धमकी

सचिन पाटील याच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सरपंच अनिल पाटील यांच्या विरोधात बातमी दिल्याच्या रागातून पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी
सचिन पाटील (रा. माधवनगर) याच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिष आवळे याने या बाबत फिर्याद दिली आहे.

माधवनगर।येथील एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अतिश आवळे यांनी काही दिवसापुर्वी शुक्रवार पेठेतील दुर्गाप्रसाद हॉटेल जवळील गटारी बद्दलची बातमी दिली होती. ह्या गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले
असून त्यांची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
ही बातमी सरपंच अनिल पाटलांच्या विरोधात आहे असा समज करून सचिन पाटील यांनी त्यांच्या
मोबाईल वरून अतिश आवळे यांना तू ग्रामपंचायती मध्ये ये तुला दाखवितो अशी धमकी दिली. या प्रकरणी आवळे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास हवलदार विकास जंगम हे करीत आहेत.
दरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई जुजबी असून
कलमाखाली कठोर कारवाई करण्याची मागणी अतिश आवळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्याकडे केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close