ताज्या घडामोडी

तालुका माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार बैठक शिक्षणमहर्षी स्व.माधवराव नागडेकर अण्णा शिक्षक पतसंस्था येथे माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश जोरी सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

दि.७/१२/२०२० रोजी येवला तालुका माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार बैठक शिक्षणमहर्षी स्व.माधवराव नागडेकर अण्णा शिक्षक पतसंस्था येथे माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश जोरी सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील समस्या वर चर्चा झाली. विनाअनुदानित शाळांना फेर मूल्यांकन न करता अनुदान देणे.
2005 पूर्वी नियुक्त पण 100% 2005नंतर झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करणे.
कोव्हीड च्या परिस्थिती मुळे विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळेतील कर्मचारी अतिरिक्त करू नये.
सेवाज्येष्ठता याद्या संपूर्ण पणे अद्ययावत असाव्यात.
सेवाज्येष्ठता धरताना सुरुवातीला नियुक्ती वेळी BEd अहर्ता असणाऱ्या व्यक्तीलाच पदोन्नती द्यावी.
तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघाची सभासद संख्या वाढवणे
तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या पाल्यांचा, पदोन्नती मिळालेल्या (मुख्याध्यापक) तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळ्या पतसंस्थेत पदाधिकारी पदी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा यांचा यथोचित सन्मान करणे.
यावेळी कार्यवाह डी.आर.नारायणे यांनी बैठकीला संबोधित केले.
यावेळी प्राथमिक स्वरूपात कु.ऋतुजा नागडेकर, कु.हर्षदा थळकर, चि. आदिराज नारायणे यांचा तर नवनियुक्त प्रसेन पटेल व सुधीर आहेर सर यांचा सत्कार माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला.
शरदराव हिवाळे, बी.सी.चव्हाण, पोपट बारे, राहुल अडांगळे, राजेंद्र पाटील,सौ.सुषमा पैठणकर मॅडम उपस्थित होत्या.
उपाध्यक्ष श्री. रवींद्र थळकर यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close