ताज्या घडामोडी

सगळेच संशयास्पद*पैशाने काहीही खरेदी करता येते हे सूत्र राज्यकर्त्यांनी इतर मीडियाच्या बाबतीत वापरले मात्र डिजिटल मीडियाच्या संदर्भात हे सूत्र शक्य नाही…अद्वैत चव्हाण

*सगळेच संशयास्पद*
मित्रांनो अद्वैत कन्सल्टन्सी च्या माध्यमातून आम्ही गेल्या तीन वर्षापासून देशभरामध्ये डिजिटल न्यूज नेटवर्क उभारले आहे. महाराष्ट्रासह देशभरात तेराशे हून अधिक न्यूज वेबसाईटच्या माध्यमातून अद्वैत कन्सल्टान्सी वाचकांपर्यंत बातम्या पोहोचण्यासाठी सहाय्य करत आहे. गेल्या 11 डिसेंबर पासून अद्वेत कन्सल्टन्सी च्या वतीने जवळपास 40 हून अधिक न्यूज वेबसाइट्स चे गूगल ॲप प्रकाशित करण्यासाठी गुगल कडे पाठवलेले आहे. मात्र अद्यापही या ॲप ला गुगल ने पेंडींग ठेवलेले आहे. बॉलीवूड ड्रग्स प्रकरण, वेगवेगळ्या भूखंड भ्रष्टाचार, राज्यकर्त्यांचा नालायकपणा, शेतकऱ्यांचा आंदोलन, कुरणा संदर्भातील बातम्या डिजिटल मीडियाने कोणत्याही दबावाला बळी न पडता मांडलेल्या आहेत. कदाचित गुगल androd ॲप ला विशेषतः न्युज वेबसाईट्सच्या गुगल ॲपला प्रकाशित करण्यासाठी गुगल इतका वेळ का घेत असेल?? राज्यकर्त्यांचा अप्रत्यक्ष दबाव यामागे तर नाही ना? मुळात डिजिटल मीडिया आता सर्वच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा समज त्यांनी करून घेतला आहे. भ्रष्ट लोकांना डिजिटल मीडियाची जी भीती वाटते खरेतर ती भीती इतर मिडीयाची सुद्धा वाटायला हवी. मात्र पैशाने काहीही खरेदी करता येते हे सूत्र राज्यकर्त्यांनी इतर मीडियाच्या बाबतीत वापरले मात्र डिजिटल मीडियाच्या संदर्भात हे सूत्र शक्य नाही आणि मग डिजिटल मीडियाच्या लोकांना टेक्निकली अडचणीत आणण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांच्या पॉलिसीज बदलायला लावायच्या असे एकंदरीत राजकारण असल्याचा संशय मला आहे.
याबाबत महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून गुगल कडे लेखी स्वरूपात लवकरच तक्रार दाखल करून न्यूज वेबसाईट्सच्या आपला शक्य तेवढ्या लवकर प्रकाशित करण्या संबंधी कळविण्यात येईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close