कृषीक्राईम

नाशिक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्या एकुण १९९ शेतकऱ्यांच्या पदरात ६ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपये रक्कम भेटली*.

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

*नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्या एकुण १९९ शेतकऱ्यांच्या पदरात ६ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपये रक्कम भेटली*.

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेतला गेला. यामध्ये सर्वाधिक १८१ गुन्हे नाशिक ग्रामिणमध्ये दाखल झाले असून आतापर्यंत वरील जिल्ह्यांमधील एकुण १९९ शेतकऱ्यांच्या पदरात ६ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम पडली आहे. उर्वरित ५ कोटी ८४ लाख ४५ हजार ६१० रुपयांची रक्कम देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली. तीन महिन्यांत नाशिक परिक्षेत्रात सुमारे १ हजार १९२ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचा पाठपुरावा करत १९१ व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आणि उर्वरित २०० व्यापाऱ्यांशी तडजोड करत पोलिसांनी १९९ व्यापाऱ्यांना सुमारे ६ कोटी ७५ लाख ८८ हजार १०० रुपयांची रक्कम परत करण्यास पोलिसांना यश आल्याचे दिघावकर म्हणाले.
अहमदनगरमध्ये ९, जळगाव, धुळ्यातून प्रत्येकी ४ तर नंदूरबारमधून १४ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे अर्ज पोलिसांकडे केले होते. यामध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातून १ हजार १६१ अर्ज नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाले होते. यामध्ये एकूण ४४ कोटी ५७ लाख ७४ हजार ३५४ रुपयांची मोठी फसवणुक झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांचा राज्यात व राज्याबाहेर कसोशीने शोध सुरु केला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close