ताज्या घडामोडी

नाशिक महानगरपालिका,नाशिक*

कपील कट्यारे..

*नाशिक महानगरपालिका,नाशिक*

ढगाळ हवामान वातावरणात झालेले बदल अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे सद्यस्थितीमध्ये गेल्या चार दिवसांपासून वातावरण अतिशय बदललेले आहे असे वातावरण हे विविध प्रकारांच्या विषाणू करिता पोषक असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

नाशिक शहरांमधील कोरोना हा नियंत्रित असला तरी सुद्धा पोषक वातावरणामुळे व नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेहमीप्रमाणे या दिवसांमध्ये आढळून येणारे सर्दी-खोकला-ताप, जनरल फ्लू- स्वाईन फ्लू यासारखे आजार वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने रुग्णांनी त्वरित महानगरपालिका किंवा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घेणे व गरज असल्यास RTPCR ची तपासणी करणे व विनाकारणमधील विषाणू पोषक असलेले वातावरण असे पर्यंत नागरिकांनी त्रिसूत्रीचा पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वारंवार हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग चा पालन करणे या गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे तसेच लग्न समारंभ अथवा अंत्यविधी व इतर कुठलाही कार्यक्रम याठिकाणी गर्दीत जाणे टाळले पाहिजेत. तसेच या सर्व ठिकाणी शासन मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या आयोजकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व व्यापारी बंधू ,भाजीविक्रेते, फळविक्रेते, दूध विक्रेते यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी देखील नो मास्क नो एन्ट्री चा अवलंब केला गेला पाहिजेत जेणे करून आजाराचा प्रसार होणार नाही असे आवाहन नागरिकांना केले आहे.

कैलास जाधव
आयुक्त
नाशिक महानगरपालिका,नाशिक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close