ताज्या घडामोडी

मनमाड अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मनमाड शहर शाखेतर्फे समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंकाई येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

भारती धिंगान (प्रतिनिधी)

मनमाड अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मनमाड शहर शाखेतर्फे समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंकाई येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला समितीतर्फे पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले. तसेच मनमाड शहरात समितीच्या शाखा ओपन करणे, आदी विषयावर सखोल चर्चा होऊन समिती प्रवेश सोहळा संपन्न झाला. या प्रवेश सोहळ्यात सचिन भाऊ हुसळे, सचिन अहिरे, साहेबराव टिटवे, शिलाबाई सांगळे, आदींनी प्रवेश घेतला. यावेळी सरला गोड गाली या (महिला शहर उपाध्यक्षा) फातिमा मलबारी (शहर सचिव) यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत युवा जिल्हाध्यक्ष पिंटू भाऊ वाघ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हिरामण मनोहर, तालुका कार्याध्यक्षा सुरेखाताई ढाके, शहर उपाध्यक्ष विद्याताई जगताप, शहराध्यक्ष तुषार भाऊ अहिरे, शहर उपाध्यक्षा संगीता सांगळे आदी उपस्थित होते. या उपस्थितित सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close