ताज्या घडामोडी

टोळी युध्द संपविण्यासाठी नाशिक पोलीसांची धडक कारवाई*{ नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे}

*टोळी युध्द संपविण्यासाठी नाशिक पोलीसांची धडक कारवाई*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

मा. पोलीस आयुक्त श्री. दीपक पाण्डेय यांनी दोन आठवड्यापूर्वी असे घोषित केले होते की, आम्ही नाशिक शहरातील टोळी युदाचे पुढील काही दिवसांत समुळ उच्चाटन करू, त्याअनुशंगाने पहाटे 04.00 ते 06.00 या वेळेत मा, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्फत वॉरन्ट जारी केलेल्या 38 इसमांच्या राहत्या ठिकाणी एकाच वेळी छापे घालून घरझडती घेण्यात आली. या छाप्यांमध्ये वॉरन्ट जारी केलेल्या 38 इसमांची नावे होती. त्या 38 इसमांविरूध्द चार पोलीस उप आयुक्त 1) श्री. संग्रामसिंह निशाणदार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), 2) श्री अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, 3) श्री विजय खरात, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-24 श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रीगी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), व चार सपोआ |1) श्री. मोहन ठाकुर, सपोआ (गुन्हे), 2) श्री प्रदिप जाधव, सपोआ विभाग-1, 3) श्रीमती दिपाली खन्ना, सपोआ. विभाग-2, 4) श्री अशोक नखाते, सपोआ विभाग-3, यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी, मुंबईनाका, अंबड व उपनगर या चार पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्यात आली सदर कारवाई दरम्यान ज्यांचेवर यापुर्वी गुन्हे दाखल होते अशा 1 ते 24 गुन्हेगारांच्या घरझडतीमध्ये खालील प्रमाणे हत्यारे मिळुन आली.

त्यामध्ये गावठी कट्टे-03. जिवंत काडतुसे-11, तलवार- 08, कायते – 13 चॉपर- 4, सुरे-2, फायटर – 1, हातोडा-1, रॉड-1 असे एकूण 36 घातक हत्यारे मिळून आली (1) पंचवटी पो.वणे हद्दीत तलवार-2, कोयते-3, चॉपर-2 सुरा-1, फायटर-1 असे एकुण-9 घातक अत्यारे (2) मुंबईनाका पो.ठाणे हृद्दीत तलवार- 3, कोयते-3, चॉपर-1, सुरा-1 असे एकुण-08 घातक हत्यारे (3) अंबड पो.ठाणे हद्दीत गावठी कट्टा-1, जिवंत काडतुस-2 तलवार-2, कोयते-6, चॉपर-1, हतोडा-1, रॉड-1 असे एकुण फायर आर्मसह-14 घातक हत्यारे आणि (4) उपनगर पो.ताणे हद्दीत कट्टा-1, तलवार- 1, कोयते-2 असे एकुण फायर आर्मसह-4 घातक हत्यारे मिळुन आली. चार पो. वणे मध्ये एकुण आर्म अंक्ट-3/25 प्रमाणे 2 व आर्म अक्ट-4/ 25 प्रमाणे असे एकुण 25 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मा. श्री. दीपक पाण्डेय साो. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे धडक कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसला असुन, यापुढेही अशा प्रकारच्या मोहिम पोलीस आयुक्तालयात अचानकपणे राबविण्यात येणार आहे.

सदर कारवाईमध्ये पोलीस उप आयुक्त, सहा पोलीस आयुक्त यांचेसह 40 पोलीस निरीक्षक, 85 सहा.पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक, 543 पोलीस अंमलदार 120 महिला पोलीस अंमलदार सहभागी झालेले होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close