ताज्या घडामोडी

भारती धिंगान(प्रतिनिधी) रेल्वे ट्रॅक्शन कारखाना नासिक रोड प्रशासन कार्यालया द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारती धिंगान(प्रतिनिधी)

रेल्वे ट्रॅक्शन कारखाना नासिक रोड प्रशासन कार्यालया द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कारखाना प्रबंधक श्री एस सी चौधरी, उपप्रमुख कारखाना प्रबंधक हुकुमचंद साहेब, अकाउंट ऑफिसर मृत्युंजय कुमार, शिवकुमार ए एम एम साहेब, मिलिंद देहाडे साहेब (झोनल उपाध्यक्ष तथा ऑल इंडिया एससी एसटी असोसिएशन अतिरिक्त मंडळ नासिक रोड) सी आर एम एस चे अध्यक्ष सूर्यभान खैरे, इ सी सी बँकेचे डेलिगेट श्री शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सूत्रसंचालन कु. दिपाली अनिल पांडव यांनी केले. त्रिशरण पंचशील पठाण हरीश जाधव साहेब यांनी केले. सुचित्रा मॅडम, मिलिंद देहाडे, विश्वास साबळे, अनिल जगताप, अविनाश कटारे यांनी केले. आभार प्रदर्शन संघटन अध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे व सचिव मिलिंद देहाडे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्येने रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. तरी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात यश आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close