ताज्या घडामोडी

सत्ताधारी शेकाप पक्षानी लोकहिताची कामे नजरे समोर न ठेवता स्वतःच्या इच्छे नुसार विकास कामाना प्राधान्य तर विरोधी पक्ष शिवसेनाची पण पाच वर्षे नमती भूमिका – खालापुर ग्रामस्थ दिपक जगताप

खालापूर – समाधान दिसले

खालापूर नगर पंचायत अस्तित्वात येऊन पाच वर्षे पूर्ण झाले असून सन 2015 मध्ये झालेल्या नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये मतदार राजांनी खालापूरमध्ये शिवसेना पक्षाचा असलेला बोलबाला व वर्चस्व मोडीत काढत 17 नगरसेवका पैकी 11 नगरसेवक शेतकरी कामगार पक्षांचे निवडून देत त्याच्या पारड्यात एकहाती सत्ता दिली. शेकापने राष्ट्रवादी पक्षाचे 2 नगरसेवक बरोबर घेऊन खालापूर नगर पंचायत वर पहिल्या टर्ममध्ये 5 वर्ष आपली सत्ता कायम ठेवली यावेळी शिवसेना पक्षांनी आपल्या 5 नगरसेवकाच्या साथीने विरोधकांची भूमिका बजावली.

परंतु ज्या मतदार राजांनी शेतकरी कामगार पक्षाला ज्या विकासाच्या मुद्यावर एक हाती सत्ता दिली. ती लोकहिताची विकास काम झालेली दिसून येत नसून विकास काम करताना लाखो रुपयांच्या निधीचा वापर विकास कामांन पेक्षा ती विकास काम करणाऱ्या ठेकेदारांच्या सोयीसाठी केलेली दिसून येत आहेत.

यामध्ये प्री कास्ट शौचालय चा निकृष्ट दर्जा असून पण त्याचा घाट घालून लाखो रुपये वाया घालवले 1 महिन्यात सर्व शौचालय तुटून पडली तरी त्यावर कारवाई केली गेली नाही लाखो रुपये वाया.

 

नाना नानी पार्क साठी पूर्वी लाखो रुपये खर्च करून लोकार्पण पुन्हा त्यावर ओपन जीम आणि बाल उद्यान करून लाखो रुपये खर्च करून पाच वर्षात दोन वेळा लोकार्पण.

 

नगर पंचायतीच्या विविध प्रभागात लहान मुलांनसाठी खेळण्यासाठी गार्डन केले पण ती पण निकृष्ट दर्जाची आज ही उद्यान अस्तित्वात आहेत. किंवा या पुढे राहतील का हा मोठा प्रश्न असून त्यावर लाखो रुपये खर्च झालेले वाया गेले.

खालापूर फेस्टिवलच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या निधीचा वापर परंतु त्यातून निष्पन्न काही नाही.

 

वनखात्याच्या जागेतून अनाधिकृत रस्ता आणि गार्डन तयार केले त्याचे लोकार्पण वनखात्याची कारवाई खेळणी जप्त लाखो रुपयांचा निधी वाया.

लोकांच्या सोयीसाठी किंवा दळणवळण सोईस्कर व्हावे म्हणून दिलेले पाताळगंगा नदीवरील धामणी / कुंभिवली ते खालापूर ब्रिजचे वचन पण हवेत राहिली आहे.

या सारखे अनेक मुद्दे आहेत त्यावर नगर पंचायतीच्या सत्ताधाऱ्याकडून नागरीकाची निराशा झाली आहे. नैना शेतकरी संघर्ष समितीचा संघर्ष असो किंवा ज्योती लॉजीस्टिक सारख्या गोडाऊन मध्ये स्थानिक 4 मुले कामावर आणि बाहेर गावातील अंदाजे 50 च्या वर मुले कामाला हा दुजाभाव ?

त्याच प्रमाणे खालापूर वासीयांना अनेक वर्षांपासून भेडसावणारा मुख्य पाणी प्रश्न त्याचे काय कधी मिळणार मुबलक वापरण्यासाठी आणि पिण्याचे पाणी.

निवडणुकीत सहा महिन्यात पाणी प्रश्न सोडवून म्हणून सोशयल मीडियाच्या माध्यमातून डोक्यावर हंडा घेऊन जाणाऱ्या भगिनी दाखवून बदलतील या वाटा म्हणून फेसबुक व व्हाट्सउपवर मॅसेज फिरत होता खरोखर या भगिनींच्या बद्दलल्या का वाटा ….या सारखे अनेक प्रश्न बाकी आहेत.

शिवसेना पक्षाचे विरोधी पक्ष नेते तर 5 वर्ष सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या कामांना विरोध करताना तर कधी दिसूनच आले नाही. परंतु नैना च्या संघर्षात शिवसेना पक्षाच्या नगर सेवकांचा विरोध आणि शेतकरी वर्गाला असलेला पाठींबा कोणी विसरू शकत नाही तसेच नगर पंचायतीच्या शेवटच्या कालखंडात आमदार निधीच्या किंवा नगर विकास खात्याच्या माध्यमातून आणलेला लाखोंचा विकास निधी हे पाच वर्षातले महत्वाचे काम सोडलं तर त्याची नगर पंचायती मध्ये मागील पाच वर्षे नमती भूमिका दिसून आली.

खालापूर नगर पंचायतीची पहिली टर्म 2015 ते 2020 होती या 5 वर्षाचा कार्यकाळा संपत आला आहे. अवघ्या काही महिन्यात पुन्हा निवडणूका येणार आहेत. विकासाच्या मुद्यावर ज्याच्या हातात एकहाती सत्ता दिली त्यानी विकासाच्या मुद्द्यावर लाखो रुपयांचा चुराडा केला. लोक हितांची काम होताना दूरदृष्टी न ठेवता स्वतःच्या इच्छा महत्वाची ठेऊन विकास काम केली पण त्यात लाखो रुपये वाया पण घालवले.पाणी प्रश्न, आरोग्य, बेरोजगारी आणि स्थानिक लोकांचे मुलाचे शिक्षण, नोकरी यामुळे अन्य ठिकाणी स्थलांतर या मुद्यावर भर न देता खालापूर फेस्टिवल, नाना नानी पार्क, प्रीकास्ट शौचालय या सारख्या निधी वाया गेलेल्या
गोष्टीना प्राधान्य दिले.

तसेच लाखो रुपयांचा निधी हा तुमच्या आमच्या कष्टातून कुटूंबाच्या भविष्यासाठी उभा केलेला निधी आहे त्यातून कर रूपातून तो वजा होऊन या सेवकांना स्थानिक स्वराज संस्थाच्या माध्यमातून लोक उपयोगी विकास काम करण्यासाठी शासना कडून दिला जातो पण त्याचा अपव्यय होत असेल तर त्याला रोखण्याचा अधिकार तुम्हाला आहे. गेल्या वेळी केलेली चूक पुन्हा नका करू कृपया विचार करून तरी यावेळी मतदान करा असे मत दिपक जगताप यांनी व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close