ताज्या घडामोडी

विवाह सोहळा सार्वजनिक,सांस्कृतिक,धार्मिक तसेच आता पोलिसांची परवानगी लागणार -पोलीस आयुक्त दीपक पांडे

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – जेथे गर्दी होणार आहे अशा सर्वसार्वजनिक सांस्कृतिक, धार्मिक तसेच विवाह समारंभास आता पोलिसांची परवानगी घेणे सक्तीचे होणार असल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी केले.

आडगाव पोलिस ठाण्यात शांतता समितीचे सदस्य, पोलिसमित्र व पोलिस पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ज्या भागात पोलिस चौकीची मागणी आहे तेथे जागा उपलब्ध असल्यास तेथे त्वरित पोलिस चौक्या उभारण्यात येतील. ज्या चौक्यांवर सुविधा नाहीत, त्या बंद करण्यात येतील
पोलिस आयुक्त पांडे यांनी
आढावा घेतला. तसेच शांतता समिती सदस्य, पोलीसपाटील, पोलीसमित्र यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येक नागरिक साध्या वेशातील पोलीस असून, त्यांनी जनसमस्या गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. पोलीसपाटील वर्गाने कोरोनाकाळात केलेल्या कामाची पोलीस खात्याने दखल घ्यावी, पोलीस आयुक्तालयाकडून त्यांना प्रमाणपत्र मिळावे, बळीमंदिराजवळील वाहतूक समस्या सोडवावी तसेच ओढा, माडसांगवी, शिलापूर गाव हद्दीत रस्त्यांवर व तपोवन, विडी कामगार, मिरची चौकात गतिरोधक बसवावे, तपोवनातील टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशा तक्रारी नागरिकांनी मांडल्या. यावेळी बहुतांश तक्रारी या महापालिकेशी संबंधित असून, त्यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

नगरसेवक उद्धव निमसे यांनी मिर्ची हॉटेल चौकात व्यावसायिक गाड्या उभ्या राहतात, त्यामुळे येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीची गरज असल्याचे सांगितले.
बैठकीला पोलीस उपायुक्त अमोल तांबे, संग्रामसिंग निशानदार, प्रदीप जाधव, सीताराम गायकवाड, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भगत, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख, नगरसेवक उद्धव निमसे, नितीन माळोदे, सुरेश खेताडे, डॉ. मृणाल पाटील, अजिंक्य वाघ, शशिकांत राऊत, गजानन भोर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close