ताज्या घडामोडी

डोळवली – केळवली मार्गावर अपघाताची मालिका सुरूच

ठेकेदार अजून किती पाहणार प्रवाशांचा अंत ?

डोळवली – केळवली मार्गावर अपघाताची मालिका सुरूच

ठेकेदारांचा निष्काळजीपणा बेतोय वाहन चालक व प्रवासी वर्गाच्या जीवावर

ठेकेदार अजून किती पाहणार प्रवाशांचा अंत ?

खालापूर – समाधान दिसले

   राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून व खासगी ठेकेदार कंपनीकडून हाळफाटा मार्गे पळसदरी कर्जत अशा मार्गाचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण मागील काही वर्षापासून वर्षे सुरूच आहे. तीन वर्षानंतरही अनेक टप्प्याचे काम अद्याप ही शिल्लक असल्याने काही ठिकाणी मोठमोठे खड्ड्यातुन वाहनांना प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांपुढे मोठी समस्या उभी राहिली असताना संबंधित ठेकेदाराकडून धोकादायक ठिकाणी कोणतेही सावधनतेचे फलक अथवा पोस्टर लावण्यात न आल्याने अनेक वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागत असून 18 नोव्हेंबर रोजी कामशेत येथील एका वाहन चालकांला आपला जीव गमवावा तर दररोज लहान – मोठे घडत असल्याने जणू हा मार्ग अपघाताचा बनला असून याठिकाणी अपताघाताची मालिका सुरू असल्याने ठेकेदारांचा निष्काळजीपणा प्रवासी व वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे ठेकेदार अजून किती अंत पाहणार असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातामुळे जीवीत हानी होत असल्याने संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन खालापूर प्रेस क्लब संघटनेने तहसिलदार व खालापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना दिल्याने या आता प्रशासन ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जर ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला नाहीतर खालापुर प्रेस क्लब आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहे.

खालापूर तालुक्याला कर्जत तालुक्याशी जोडणारा एक मुख्य मार्ग म्हणून हाळफाटा मार्गे केळवली, पळसदरी रस्त्याची ओळख आहे. मागील तीन वर्षांपासून या रस्त्यांचे  रुंदीकरण व काँक्रीटीकरण सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळच्या माध्यमातून जवळपास 91 कोटी निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर नुतनीकरणाचे काम टी.एन.टी.इन्फ्राट्रक्चर या ठेकेदाराने घेतले आहे. 13 किमी अंतराच्या या मार्गांचे काम 18 महिन्यात पूर्ण करायचे होते. मात्र, मागील तीन वर्ष हे काम रेंगाळत सुरू आहे. वर्तमान स्थितीत काही मोठमोठे खडे, रस्त्यावर मोठाले ढिगारे, मध्येच सिमेंट तर कच्चा रस्ता, सुरक्षा बाबत पूर्णपणे दुर्लक्षमुळे या रस्त्यावर सतत अपघात होत कित्येकांना जायबंदी होण्याची  वेळ येत आहे. याठिकाणी ठेकेदारांचा निष्काळजीपणा अनेकांना धोक्याची घंटा देत असल्याने 18 नोव्हेंबर रोजी एकाला आपला जीव जागीच गमवावा लागला. त्यामुळे अनेक जण ठेकेदारांच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. तर दररोज या मार्गावर लहान – मोठे अपघात घडत असल्याने ठेकेदारांचा निष्काळजीपणा प्रवासी व वाहन चालकांच्या जीवावर बेतत असुन ठेकेदार अजून किती प्रवासी व वाहन चालकांचा अंत पाहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच या मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातामुळे जीवीत हानी होत असल्याने संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन खालापूर प्रेस क्लब संघटनेने खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार व खालापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांना दिले आहे. आता प्रशासन ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जर ठेकेदारावर योग्य ती कारवाई झाली नाहीतर खालापुर प्रेस क्लब आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.

चौकट –

हाळफाटा मार्गे पळसदरी कर्जत रस्त्यावर ठेकेदारांचा निष्काळजीपणामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत असून 18 नोव्हेंबर रोजी अपघातात एकाचा डोळवली व केळवलीच्या मध्यवर्ती जागीच मृत्यू झाल्याने ठेकेदारांचा निष्काळजीपणा सर्वाच्या जीवावर बेतत असून दररोज होणाऱ्या अपघातामुळे तसेच जीवीतहानी होत असल्याने संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व्हावा यासाठी आमच्या खालापूर प्रेस क्लबच्या वतीने तहसिलदार व खालापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. जर लवकर प्रशासनाने या ठेकेदारावर कारवाई केली नाहीतर प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.

प्रशांत गोपाळे
अध्यक्ष – खालापुर प्रेस क्लब

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close