ताज्या घडामोडी

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी एमजीएमवर कारवाई करा

कुटुंबियांचे चार दिवसांपासून उपोषण, एमजीएम प्रशासनाकडून दुर्लक्ष

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी एमजीएमवर कारवाई करा

कुटुंबियांचे चार दिवसांपासून उपोषण, एमजीएम प्रशासनाकडून दुर्लक्ष
:-
पडेगाव:- परिसरातील एमजीएमच्या गोल्फ मैदानाच्या जवळील शेततळ्यात अयान बेग अमजद बेग (१४,अन्सारकॉलनी, पडेगाव) या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ७ मार्च रोजी घडली होती. या शेततळ्याच्या सुरक्षिततेसाठी कुंपन नसल्याने विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी एमजीएम प्रशासनावर कारवाई करावी, या मागणीसाठी कुुटुंबियांनी एमजीएमसमोर उपोषण सुरू केले आहे. चार दिवसांपासून उपोषण सुरू असताना प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही.

अयान बेग हा पडेगाव परिसरातीलच सरोश उर्दू हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत होता. त्याचे वडील हे मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिवार्ह चालवितात. ७ मार्च रोजी दुपारी घरातून गेलेला अयान रात्री घरी परतलाच नाही. ८ मार्च रोजी सकाळी पडेगाव परिसरातील गोल्फ मैदानाजवळील शेततळ्यात अयानचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या शेततळ्याला कुठलीही सुरक्षा भींत किंवा कुंपन नाही. त्यामुळेच विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या एमजीएम प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी छावणी पोलीस ठाण्यात तीन वेळा तक्रारी देण्यात आल्या. परंतु, एमजीएम प्रशासनाच्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई करण्याचे टाळले. पडेगाव हा भाग रहिवाशी असून, अनेक मुले या भागात खेळत असतात. या दोन्ही तळ्यांना सुरक्षा कुंपन नसल्याने बुडण्याचा धोका कायम आहे. यापूर्वीही तीन जणांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे ही तळी बुजवून टाकावी, गोल्फ मैदान तात्काळ बंद करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या एमजीएम प्रशासनावर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘नारी शक्ती’ च्या वतीने मंदाकिनी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मयत अयान याच्या कुटुंबियांनी एमजीएमसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी उपोषणाचा चौथा दिवस असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी एमजीएमसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे मंदाकिनी वाघमारे व सामाजिक कार्यकर्ते नजीम काझी यांनी सांगितले.
……………..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close