ताज्या घडामोडी

पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला यांची मध्यस्थी, आलाना विरोधातील साखळी उपोषण १४ डिसेंबर पर्यंत स्थगित.

पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला यांची मध्यस्थी, आलाना विरोधातील साखळी उपोषण १४ डिसेंबर पर्यंत स्थगित.

खालापूर – समाधान दिसले
स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा यासाठी साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी आलाना फ्रिगोरी फिको कंपनी विरोधात साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला यांच्या सोबत झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाने दहा दिवसांची मुदत मागून लेखी पत्र दिल्याने ग्रामस्थांनी साखळी उपोषण १४ डिसेंबर पर्यंत स्थगित केले आहे.
 
  स्थानिकांना रोजगार देण्याच्या मुद्द्यावरून साजगाव ग्रामस्थ आणि आलाना कंपनी सहा वर्षानंतर पुन्हा समोरासमोर आले आहेत. स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे यासाठी साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी एल्गार पुकारला असून गुरुवारपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण केले जाणार होते. कंपनीचा नवीन प्लांट सुरू झाला असून या नव्या प्लांटमध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना सामावून घ्यावे. सहा वर्षापूर्वी शब्द देवूनही न घेतलेल्या दहा स्थानिक तरुणांना नोकरी द्यावी. सध्या काम करत असलेल्या कामगारांना कायम करून कंपनीत काम द्यावे. संपूर्ण प्रकल्पात स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. व्यवस्थापना बरोबर अनेक बैठका होवूनही सकारात्मक मार्ग न निघाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

  तर पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला यांच्या दालनात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, सरपंच अजित जाधव, उपसरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजित देशमुख, पांडुरंग कदम, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय पुरी, उमेश वरघडे तसेच व्यवस्थापनाच्या वतीने अनिलकुमार संचेती, विल्सन डेव्हिड, के. एन. पाटील उपस्थित होते. जर १४ डिसेंबर पर्यंत मार्ग निघाला नाही तर साखळी उपोषण केले जाणार आहे असे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.

चौकट –

पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला यांनी व्यवस्थापन आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक त्यांच्या दालनात घेतली. यावेळी व्यवस्थापनाने दहा दिवसांचा अवधी मागून घेत तशा प्रकारचे लेखी पत्र दिल्याने ग्रामस्थांनी १४ डिसेंबर पर्यंत साखळी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
बाबू सिताराम पोटे, स्थानिक ग्रामस्थ

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close