ताज्या घडामोडी

शाळा बंद शिक्षण चालू* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड, केंद्र:-जोपूळ.

*शाळा बंद शिक्षण चालू*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड, केंद्र:-जोपूळ.

निफाड प्रतिनिधी:मनोहर देसले

जोपूळ केंद्राचे केंद्रप्रमुख *श्री दादासाहेब ठाकरे* यांनी आज चिंचखेड शाळेला भेट दिली असता गावात विठ्ठल मंदिरात *श्री कोंडावार* यांच्या गणित विषयाच्या तासिकेत नफा तोटा या घटकावर मार्गदर्शन चालू होते बरेच विद्यार्थी उपस्थित होते.त्यावेळी मा.ठाकरे साहेब यांनी विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमाविषयी चर्चा केली व नफा तोटा या विषयी एक उदाहरण स्थानिक बाजारानुसार टोमॅटो, द्राक्षबाग यावर आधारीत समजावून सांगितले.त्यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.यानंतर वेताळ बाबा मंदिर लगत श्री शंकर ठाकरे,श्री सुधाकर भामरे व प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन चालू होते.त्या विद्यार्थ्यींशी अभ्यासक्रम व अध्यापनाच्या तासिके संदर्भात चर्चा करुन मागील अभ्यासाच्या वह्या तपासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सोबत मुख्याध्यापक *श्री संजय चौधरी* सोबत होते.त्यानंतर शालेय आवारात केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांसमवेत वडाचे वृक्षारोपन करण्यात आले.यांप्रसंगी प्रांजल बापू जाधव या मुलीच्या वाढदिवसानिमित्त केंद्रप्रमुखांच्या हस्ते गोष्टींचे पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close