ताज्या घडामोडी

खालापूर नगरपंचायतीच्या रणसंग्रामाला प्रारंभ खालापूर – समाधान दिसले


खालापूर – समाधान दिसले

खालापूर नगरपंचायत निवडणूकिसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी दि.२७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी प्रस्तापित असलेल्या नगरसेवकांचे वार्ड रचनेमुळे बदल झाल्याने नव्या वार्डात नवीन सुत्र जमविण्यासाठी रणनीती ठरविण्यासाठी खालापूर नगर पंचायती मधील राजकारणी मंडळी व्यस्त झाली असून आगामी निवडणूक लढवून जिंकण्यासाठीची गणिते बांधण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.

खालापूर नगरपंचायतीचे एकूण सतरा प्रभाग असून प्रभागाच्या क्रमाकांत बदल करण्यात आल्याने आरक्षण सोडती दरम्यान गोंधळाचे वातावरण झाले होते. त्यातच आरक्षणामुळे हक्काचे प्रभाग किंवा आपले मतदार असलेला भाग वेगळा झाल्याने अनेकांची पंचायत झाली आहे. नगरपंचायतीच्या सतरापैकी २ प्रभाग अनुसूचित जाती, ५ प्रभाग अनुसूचित जमाती, ५ प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर पाच प्रभाग सर्वसाधारण अशी रचना करण्यात आली आहे. अनुसूचित जातीच्या दोन पैकी एक जागा महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या पाच जागा पैकी महिलांसाठी तीन जागा राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातून पाच पैकी तीन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर सर्वसाधारण मधील पाच पैकी दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने सतरा पैकी नऊ नगरसेविका महिला असून खालापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा महिलाराज अवतरणार असले तरी उर्वरित राहिलेल्या प्रभागातील सर्वसाधारण प्रभागातून आपली वर्णी नगर पंचायतीवर लागते का?यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

नवीन प्रभाग आरक्षणाचा फटका विद्यमान नगरसेवक व नगरसेविकेना बसला आहे.

खालापूर नगरपंचायत  आरक्षण रचना.

१)साबाईनगर – अनुसूचित जाती (स्त्री किंवा पुरूष)

२)शिरवलीवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री किंवा पुरूष)

३)वनवेवाडी – सर्वसाधारण

४)निंबोंडे – अनुसूचित जमाती (महिला राखीव)

५)दांडवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला राखीव)

६)वनवे – नागरिकांचा मागास प्रवर्ग(सर्वसाधारण)

७)पाटील आळी – (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला( राखीव)

८)खडकआळी – अनुसूचित जमाती महिला( राखीव)

९)खराळ आळी – अनुसूचित जाती महिल( राखीव)

१०)बाजारपेठ – अनुसूचित जमाती महिला(राखीव)

११)चाळकेआळी – सर्वसाधारण महिला (राखीव)

१२)फराट आळी – सर्वसाधारण महिला (राखीव)

१३)कुंभार आळी – अनुसूचित जमाती महिला (राखीव)

१४)रोहिदासनगर – सर्वसाधारण(स्त्री किंवा पुरूष)

१५)महड – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला( राखीव)

१६)महड २ – सर्वसाधारण(स्त्री किंवा पुरूष)

१७)महड ३ – अनुसूचित जमाती महिला (राखीव)

तर सत्ताधारी शेकाप यावेळी शिवसेना या प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेशी आघाडी करणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र मागील निवडणूकीत आपल्या पक्षाचा दारून पराभव झालेल्या शिवसेनेला आघाडीचा बेत पटेल असे दिसत नाही. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दोनच महिन्यापूर्वी नगर पंचायतीच्या एका कार्यक्रमात आगामी खालापूर नगर पंचायतीची निवडणूक शेकाप सोबत लढविणार असल्याचे सांगितल्याने याठिकाणी राजकीय रंगत वेगळीच तापली असून निवडणूकीचा रंग जसजसा तापत जाईल तसे राजकारणातील गणित बदलत जाते हा पुर्वीचाच अनुभव आहे. त्यामुळे आगामी काळात खालापूर नगरपंचायतीच्या निवडणूकीची गणिते कशी बदलतात ते पाहणे सध्या तरी गंमतीचे राहणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close