आपला जिल्हा

श्रीक्षेत्र सरला बेट प्रमाणेच ,आळंदीतही भव्य आश्रम करण्याचा शिर्डीकरांचा मानस!

शिर्डीकरांचा असाही वेगळा उपक्रम....

श्रीक्षेत्र सरला बेट प्रमाणेच ,आळंदीतही भव्य आश्रम करण्याचा शिर्डीकरांचा मानस!

शिर्डीकरांचा असाही वेगळा उपक्रम….

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

शिर्डीकरांनी 171 वा सद्गुरु गंगागिरिजी महाराज यांचा सप्ताह यशस्वीपणे पूर्णत्वास नेला..
सद्गुरू साईबाबांच्या कृपाशिर्वादाने शिर्डीतील सर्व स्तरातील घटकांनी आपापल्या परीने सप्ताहासाठी भरभरून देणगी दिली..नेत्रदीपक सप्ताह सोहळा पूर्ण होऊन देखील उर्वरीत राहिलेल्या देणगीतून समस्त शिर्डीकारांना अभिमान वाटेल अशी भव्य वास्तु सराला बेटात प्रत्यक्ष साकारण्यात आली..
विशेष म्हणजे सद्गुरु साईबाबा शताब्दी आश्रम पूर्णत्वास येऊनही जवळपास 14 लाख 75 हजार रुपये शिल्लक राहिले..नुकतीच ही देणगीरूपी रक्कम सराला बेटाकडे वर्ग करण्यात आली असून ही देणगी आळंदी येथील धर्मशाळा बांधण्याकामी खर्च करण्यात येणार आहे…आळंदी येथे धर्मशाळा बांधण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांचा देखील सहभाग असावा असा प्रयत्न आहे..
एक मात्र नक्की “साईबाबा की झोली, यही कुबेर का भंडार….” याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही….!
श्रीक्षेत्र सरला बेट प्रमाणेच आळंदीतही अखंड हरिनाम सप्ताहच्या शिल्लक रक्कम व वर्गणी करून भव्य आश्रम करण्याचा शिर्डीकरांचा मानस!
असल्याचे सांगण्यात आले आहे
शिर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताह च्या शिल्लक निधीतून राहिलेल्या व श्रीक्षेत्र सरला बेट येथे बांधण्यात आलेल्या साई समाधी आश्रमाच्या निधीतील 14 लाख 75 हजार रुपयाचा निधी सरला बेट येथील संत गंगागिरी महाराज आश्रमाकडे वर्ग करण्यात आला आहे,
शिर्डी येथे श्री साई समाधी शताब्दी निमित्ताने मंहत गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह 171 वा 2018साली शिर्डीत संपन्न झाला, त्यातून एक लाख सहा हजार इतकी रक्कम शिल्लक राहिली होती ,या शिल्लक राहिलेल्या रकमेत आणखी साईभक्त, शिर्डीकर व संस्थान ने वर्गणी जमा करून त्यातून श्रीक्षेत्र सरला बेट येथे श्री साई समाधी आश्रम भव्यदिव्य असा बांधण्यात आला व त्याचे उद्घाटन नुकतेच झाले आहे, त्याच प्रमाणे श्री क्षेत्र आळंदी येथे असाच भव्यदिव्य आश्रम होण्याचा साईभक्त, शिर्डीकर व भाविकांचा मानस त्यासाठी शिर्डीकर यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे व त्यासाठी शिर्डी येथील श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यातूनही शिल्लक राहिलेला निधी सरला बेट येथील महंत गंगागिरी महाराज आश्रमाला 14 लाख 75 हजार रुपयांचा चेक नुकताच संदीप पारख,राहुल गोंदकर।यांनी दिला आहे, शिल्लक राहिलेल्या हा निधी सरला बेट येथील आश्रमाकडे वर्ग करण्यात आला आहे, या शिल्लक राहिलेल्या रकमेतून आळंदी येथे धर्मशाळा किंवा भव्यदिव्य आश्रम बांधण्याचा मानस असून अजूनही त्यात शिर्डीकर यांची मदत व योगदान राहणार आहे, श्रीक्षेत्र सरला बेट प्रमाणेच आळंदीत ही भव्यदिव्य असा आश्रम लवकरच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे, सद्गुरु श्री साईबाबा तसेच मंहत गंगागिरी महाराज व नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सरला बेटाचे मठाधिपती ह-भ-प रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने नक्कीच श्री क्षेत्र आळंदी येथे ही भव्यदिव्य असा आश्रम होईल अशी आशा आता शिर्डीकर, साईभक्त व भाविक वर्गातून व्यक्त केली जात आहे,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close