ताज्या घडामोडी

पाहिली थकबाकी द्या …नंतर भात खरेदी केंद्र सुरू करा ;

पाहिली थकबाकी द्या …नंतर भात खरेदी केंद्र सुरू करा ;

# जो पर्यत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यत भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नाही – शेतकरी आक्रमक

कर्जत : विजय डेरवणकर

कर्जत तालुक्यात शेतीच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी भातपिकाचे उत्पन घेतात. या पिकविलेल्या उत्पादनाला चांगला मोबदला मिऴावा म्हणून शासनाने भात खरेदी केंद्राची संकल्पना राबवून शेतक-यांचा भात थेट या केंद्रात खरेदी केला जाऊ लागला. पंरतू, गेल्या वर्षभरापासून नेरळ आणि परिसरातील १२ शेतकरी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात आपल्या विक्री केलेल्या भाताचे पैसे मिळावे म्हणून चकरा मारत असून त्यांना वर्षभर वेगवेगळी कारणे आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने हे सर्व शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात असून जोपर्यत पैसे मिळत नाहीत तोपर्यत केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही असा इशारा दिला आहे.

शासनाच्या माध्यमातून हमखास चांगला भाव आणि पैसेही हमखास मिळणार या आशेने चांधई, कोदिवले, बार्डी, नेरळ, कळंब, उकरूळ, चिंचवली, तळवडे, भडवळ, बोरगाव, माणगांव, वंजारपाडा या गावातील १२ शेतक-यांनी मागील वर्षी आपले भात या केंद्रात विक्री केली. सदर शेतक-यांनी यावेळी बँक खात्याची माहितीही जमा केली आणि शेतक-यांना भातविक्रीचा मोबदला त्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले. परंतू, काही तांत्रिक अडचणी, चुका केंद्राकडून झाल्याने शासनाकडून पैसे आजपर्यत येऊ शकले नाहीत. वर्षभरात शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनांचा प्रवित्रा घेतला असून जोपर्यंत आमचे पैसे आम्हाला मिळत नाही तो पर्यंत तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नसल्याची भूमिका घेतली आहे .

प्रतिक्रिया :

श्री.वसंत अनाजी चहाड (शेतकरी कोदिवले)
गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्व शेतकरी वेळोवेळी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात पैसे कधी मिळणार याबाबत पाठपुरावा करत असून आम्हाला प्रत्येकवेळी नवनवीन कारणे दिली जात आहेत. कधी मशीनमध्ये खराबी आहे, कधी खातेक्रमांक चुकीचा दिला आहे, कधी नाव चुकीचे आहे अशी विविध कारणे दिली जात आहेत. गेल्या वर्षभरापासून कोविड सारख्या महामारीच संकट आले. अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले यामुळे आमच्या हक्काच पैसे असूनही आम्हाला वर्षभर हेलपाटे मारावे लागत असून अजूनही पैसे कधी मिळणार याबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. आमचे पैसे जोपर्य़त आम्हाला मिळत नाही तोपर्यत आम्ही केंद्राला नवीन भात खरेदी करून देणार नाही.

प्रतिक्रिया:-

श्री.विष्णु कालेकर (भात खरेदी केंद्र चालक नेरळ )
या शेतक-यांचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे अडकले असून आम्ही या शेतक-यांची थकबाकी लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करत आहोत. पंरतू, अलिबाग येथे वेळोवेळी पाठपुरावा करूनही वेगवेगळ्या तांत्रिक बाबी सांगून शेतक-यांचा मोबदला रखडवून ठेवला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close