क्राईम

नाशिक अंबड पोलीस स्टेशन कडील अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद* *काईम ब्रॅन्च युनिट – ०२ ची कामगिरी*

*कपील कट्यारे नाशिक 

नाशिक अंबड पोलीस स्टेशन कडील अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद*
*काईम ब्रॅन्च युनिट – ०२ ची कामग
नाशिक – शहरातील रेकॉर्ड वरील घरफोडी करणारे आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस आयुक्त साो. दीपक पाण्डेय यांनी आदेशीत केले होते.

मा. पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार साो. (गुन्हे/विशा), मा.सहाय्यक पोलीस आयुक्त

श्री मोहन ठाकुर साो(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने सहा.पो. निरी/अभिजीत सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून अंबड पोलीस स्टेशन कडील । गुरनं ६५५/२०२० भादवि कलम ३८०,४५४,४५७ प्रमाणे दाखल गुन्हयात पाहिजे असलेले आरोपी नामे हफीज रेहमान उर्फ चुलबुल अतीक रेहमान खान यास सपोनिरी/ अभिजीत सोनवणे, पोहवा/ शंकर काळे, यशवंत बेंडकुळे, पोशि/जयंत शिंदे यांनी सापळा रचुन पकडुन त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी अंबड पोलीस
स्टेशन, नाशिक शहर यांचे ताब्यात दिले आहे. आरोपी कडुन गुन्हयात चोरलेला १)२०,००० रू की. चे एक जेन्टस सोन्याची अंगठी तिचे वजन ५ ग्रॅम वजनाचे

२)१२,००० रू की. चे एक जेन्ट्स सोन्याची अंगठी तिचे वजन ३.५०० ग्रॅम वजनाचे

३)९,००० रू की. चे एक लेडीज सोन्याची अंगठी तिचे वजन २ ग्रॅम वजनाचे ४)१८,००० रू की. चे दोन सोन्याची कर्णफुले टॉप तिचे वजन ४.५०० ग्रॅम वजनाचे ५)१७,००० रू की. चे दोन सोन्याची कानातील वेल तिचे वजन ४ ग्रॅम वजनाचे असा एकुण अंदाजे ७६,००० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करून अंबड पोलीस स्टेशनचे ताब्यात

देण्यात आला आहे. सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हेशाखा युनिट कं.२ कडील सपोनिरी/ अभिजीत सोनवणे, पोहवा/रमेश घडवजे, शंकर काळे, यशवंत बेंडकुळे, संपत सानप, पोना/ नंदकुमार नांदुरडीकर, पोशि/ गौरव गवळी, जयंत शिंदे, महेंद्र साळुंखे यांनी केलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close