सांस्कृतिक

लव्हस्टोरी विडीओमुळे अल्पवधीत काळात झाला साहील गायकर फेमस

साहिल गायकर आपल्या कॉमेडीच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनावर गाजवतोय अधिराज्य

लव्हस्टोरी विडीओमुळे अल्पवधीत काळात झाला साहील गायकर फेमस

साहिल गायकर आपल्या कॉमेडीच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनावर गाजवतोय अधिराज्य

खालापुर – समाधान दिसले

  • फेसबुक, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर सर्वांना युट्युब वरील विडीओ बघण्याचे वेड लागल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळत असून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येचं याचे क्रेझ वाढू लागले आहे. एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करून तरुण मंडळी विडीओ बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. या अॅपवर भन्नाट विडीओ अपलोड करुन अनेक जण प्रसिद्धीच्या झोतातही आले असून असाच पनवेल परिसरातील साहिल गायकर आपल्या कॉमेडीच्या कलेतून लोकप्रिय ठरू लागल्याने अल्पवधी काळातच या तरुणाला कॉमेडी माध्यमातून युट्युब वरून प्रसिद्धी मिळु लागल्याने हा तरुण एक प्रकारे सेलिब्रिटीच बनल्याने ग्रामीण भागातील उगवता कलाकार म्हणून साहिलला पाहिले जात असुन साहिल हा लव्हस्टोरी विडीओ बनविण्यात माहिर असून त्याच्या लव्हस्टोरी कहाणीमुळे त्याला सर्व तरुणाई चॉकलेट बॉय म्हणुनही संबोधत आहेत.
  • साहिल गायकर हे लवकरच काॅमेडी बरोबरच देश भक्ती गीता कडे वळतील असा विश्वास पोलीस टाईम्स न्युज प्रतीनीधी समाधान दिसले यांनी व्याक्त करत  साहील गायकर यांना भावि वाटचालीस शादेचंवरदान लाभो असी सदभावना व्याक्त केल्या 

आपल्या कलेच्या या माध्यमातून चित्र – विचित्र आवाज आणि फिल्मी संवादात व्हिडीओ बनवण्याचे “फॅड’ तरुणाईमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने तासनतास तरुणाई युट्युबवरील कॉमेडी विडीओ बघण्यात गुंतलेली असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. फेसबूक, व्हाट्‌सअॅप, इन्स्टाग्राम अथवा इतर

साहील गायकर

साहिल गायकर आपल्या कॉमेडीच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनावर गाजवतोय अधिराज्य

सोशल मीडियावरून कॉमेडी विडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. मात्र निव्वळ करमणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या विडीओ तरुणाई करीता आकर्षण बनल्याने या माध्यमातून असंख्य जण आपली कला सादर करीत असल्याने असंख्य जण प्रकाश झोतात आले आहेत. असाच पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील साहिल सावळाराम गायकर तथा मोठा युट्युबर या डॉयलॉग ने फेमस झालेला कॉमेडीकार विडीओच्या माध्यमातून लोकप्रिय ठरू लागल्याने या तरुणांच्या विडीओ बहुतांशी तरुण वर्गाच्या मोबाईलमध्ये पाहावयास मिळत असल्यामुळे साहील गायकर तरुण सिलेब्रिटीच बनला आहे. साहिल गायकर हा नव तरुण हा वेगवेगळ्या प्रकारची कला सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकू लागल्याने या तरुणाला ग्रामीण भागातील उगवता कलाकार म्हणून ही संबोधले जाऊ लागले आहे. तर त्याचे सर्व चाहता वर्ग ईश्वरचरणी प्रार्थना करतात की, या कलाकाराला देव भरपूर यश देवो आणि यशाच्या उंच शिखरावर पोहचो.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close