ताज्या घडामोडी

येवला पंचायत समितीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा

संविधान दिनाची शपथ येवला पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सभापतींनी प्रवीण गायकवाड यांनी दिली

 एकनाथ भालेराव याजकडुन:-

येवला पंचायत समितीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला संविधान दिनाची शपथ येवला पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सभापतींनी प्रवीण गायकवाड यांनी येवला पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी यांच्यासहित संविधानाचे शपथ घेण्यात आली यानंतर 26 11 च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली संविधान आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आज भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषाला मुळे हे सर्व शक्य झाले आहे आज हे संविधान प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे आपल्या हक्कासाठी प्रत्येक माणूस आज संविधानामुळे आपलं म्हणणं मांडून त्याचा अधिकार मिळवू शकतो संविधानामुळे महिलांना अनेक अधिकार प्राप्त झाले त्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे संविधानामुळे आज आपली एकात्मता बंधुत्व टिकवून ठेवण्याचा काम आज संविधानामुळे होत आहे असे मत सभापती प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी अन्सार शेख साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हितेंद्र गायकवाड कक्ष ?अधिकारी रामदास चौधरी कनिष्ठ प्रशासनाधिकारी सुनील बाविस्कर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आनंद यादव कृषी अधिकारी प्रशांत वास्ते श्रीमती नूतन पाटील सुरेखा बदाने शोभा बागुल रवी थळकर निलेश टकले गणेश साबळे अर्चना गलांडे कल्पना गायकवाड कर्मचारी वृंद उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close