क्राईम

पंचवटी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी लॉकडाउनच्या काळात हॉटेल बंद असल्याचा फायदा घेवून वेटरने केलेली चोरी उघडकीस*

पंचवटी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी लॉकडाउनच्या काळात हॉटेल बंद असल्याचा फायदा घेवून वेटरने केलेली चोरी उघडकीस*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

*पंचवटी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी लॉकडाउनच्या काळात हॉटेल बंद असल्याचा फायदा घेवून वेटरने केलेली चोरी उघडकीस*
नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे
नाशिक – पंचवटी पोलीस ठाणे कडील दि १२/०९/२०२० रोजी । गुरनं ५१२/२०२० भा द वि कलम ३८१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन,सदर गुन्हयात फिर्यादी नामे अश्रफ नजिर मणियार, वय ३० वर्षे, धंदा- हॉटेल मॅनेजर, रा.ठी- एन ९, एम.जी २, २१ / २ महाराणा प्रताप चौक, नविन सिडको, नाशिक यांनी ते नोकरी करीत असलेल्या हॉटेल महाराष्ट्र दरबार हाउस ऑफ बिर्याणि, शरदचंद्र पवार मार्केट याई शेजारी, पंचवटी, नाशिक या ठिकाणी त्यांचे हॉटेल मध्ये वेटरचे काम करणारा इसम नामे राहुल संजय तुरे, वय १८ वर्षे याने लॉकडाउन मध्ये हॉटेल बंद असल्याचा फायदा घेवुन दिनांक २३/०३/२० रोजी ते २७/०८/२० चे दरम्यान होटेलचे मागिल बाजुवा पत्रा उचकटुन होटेल मध्ये प्रवेश करून हॉटेल मध्ये असलेले ७ पितळी धातुचे मोठे पातेले, १एच.पी.कंपनीचा कॉम्प्युटर सेट, इपसॉन कंपनीचा प्रिंटर, ल्युमिनस कंपनीचा इनटर व ४ बॅटया, दोन सि.सि.टि.व्हि कॅमेरे असे एकूण ४६,०००/- रू किंमतीचे चोरून नेले बाबत गुन्हा दाखल झाला.

मा वरिष्ठांचे मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाने सदरचा गुन्हा दाखल होताच सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी राहुल संजय तुरे याचा शोध घेत असल्याचा मागमुस आरोपीस लागल्याने त्याने त्याचे परिवारासह नाशिक शहरातुन पलायन केले. सदर आरोपीचा शोध धेत असताना आरोपी हा त्याचे परिवारासह ता.अकोले, जि- अहमदनगर या ठिकाणी गेला असल्याची माहिती बातमीराकडुन मिळाली तसेच त्याचेकडुन आरोपीची आई वापरत असलेला मोबाईल क्रमांक प्राप्त झाला असता त्याचा तांत्रिक तपास करून आरोपीतास गाव-विरगाव, ता. अकोले, जि- अहमदनगर येथुन दिनांक १८/११/२०२० रोजी ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचे कडे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्हा हा त्याने त्याचे साथिदार नामे १) शिवा राजु उफाडे, वय १८ वर्षे २) विधीसंघर्षित बालक तेजेस प्रभु दराडे, वय १६ वर्षे, ३) विधीसंघर्षित बालक शाम अंबादास गाढवे, वय १५ यांचे मदतीने केला असल्याचे सांगितल्याने त्यांना सुध्दा सदर गुन्हयाचे तपासात ताब्यात घेवुन त्यांचे कडे सदर गुन्हयाबाबत कसोशिने व कौशल्याने तपास करून त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी ७ नग पितळी धातुचे मोठे पातेले किंमत ३०,०००/- हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्तेबाबत अदयाप तपास चालु आहे

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा.श्री.दिपक पाण्डेय् पोलीस आयुक्त सो नाशिक शहर, मा.श्री.अमोल तांबे पोलीस उपायुक्त सो परिमंडळ १, मा.श्री. प्रदिप जाथव सहायक पोलीस आयुक्त सो विभाग १, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पो.नि अशोक साखरे ( गुन्हे) पंचवटी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार, बाळनाथ ठाकरे ,विजय मिसाळ, सागर कुलकर्णी, आर्नंदा चौधरी, विलास चारोस्कर,नितीन जगताप, राकेश शिंदे, अविनाश थेटे, गोरक्ष साबळे, कुणाल पचलोरे यांनी पार पाडली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close