ताज्या घडामोडी

सरकारच्या विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन

*कपील कट्यारे प्रतीनीधी नाशिक :-

महाराष्ट्र राज्यात मविआ सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत.  सरकारच्या विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन केले.*

*कपील कट्यारे प्रतीनीधी नाशिक :-

महाराष्ट्र राज्यात मविआ सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत.सरकार विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन केले.*

यावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका स्वाती भामरे, महिला मंडल सरचिटणीस संगिता जाधव, विजया बिरारी, देवदत्त जोशी, प्रतिक शुक्ल, शिवा जाधव, मोहन गायधनी, आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलना दरम्यान पुढील प्रमुख मागण्या केल्या.

* मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यांमधील आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय पूर्ण बिल सरकारने माफ करायला हवेत. महाराष्ट्र सरकारने तातडीने ५ हजार कोटी देऊन ही बिलं माफ करावीत.

* महाराष्ट्र सरकारने १०० युनिट वीज वापरणाऱ्यांना वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. कोरोनाच्या काळातदेखील आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीयांना सरकारने कोणताही लाभ दिला नाही.

* सरकारने दिलेल्या वीजबिलांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करीत, वीजबिल कसं भरावं ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

* महाराष्ट्र सरकारने प्रति वीज ग्राहक १२०० युनिट माफ करावे.

*राज्य सरकारने थकबाकीसाठी कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कट केल्यास भाजपा त्याठिकाणी आंदोलन करेल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close