ताज्या घडामोडी

खालापुर भाजपाच्या वतीने ‘विजबिल होळी’ आंदोलन संपन्न

खालापुर भाजपाच्या वतीने ‘विजबिल होळी’ आंदोलन संपन्न

खालापुर – समाधान दिसले

राज्यातील सर्वसामान्यांना वाढीव विजबिलातून दिलासा मिळावा याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी *’विजबिल होळी’* आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने या आदेशाचे संपूर्ण राज्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून पालन करण्यात आल्याने या आदेशाचे पालन खालापुर तालुका भाजपाच्या वतीने करीत विजबिल होळी आंदोलन यशस्वी करून सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास खालापुर भाजप मंडलाच्या वतीने पालीफाटा येथे विजबिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलजी मोरे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, खालापुर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील, वडगाव जिल्हा परिषद अध्यक्ष संदिप पाटील, विश्वनाथ पाटील, सचिन जाधव, लवेश कर्णुक, राम ठोंबरे, अंकुश मोरे, माणकीवली ग्रामपंचायत सदस्य विकास रसाळ, दत्तुबुवा मरागजे, राहुल कडव आदीप्रमुखासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close