ताज्या घडामोडी

छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा याबाबत येवला तहसीलदारानां निवेदन….

छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा याबाबत येवला तहसीलदारानां निवेदन….

राजापूर येथे मुख्य चौफुलीच्या लगतच शुक्रवारच्या रात्रीला अज्ञातांकडून छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला होता…परंतु तो पुतळा विना परवानगी घेऊन बसविल्याने… ग्रामस्थांच्या संमतीने काढण्यात आला होता…. राजापूर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा…राजापूर गावाचा ग्रामसभेचा ठराव करून शासनाने शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर.. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा तसेच राजापूर गावांतील ज्या शिवभक्तांवर अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले ते सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे याबाबत सकल शिवभक्त येवला शहर व तालुक्याच्या वतीने येवला तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आलंय..निवेदन देतांना प्रसंगी संजय सोमासे, सुदाम पडवळ,आनंद शिंदे, आदित्य नाईक,गोरख कोटमे, सागर नाईकवाडे, डॉ नंदकिशोर शिंदे, सुधाकर पाटोळे,संतोष काटे,मयूर मेघराज, संतोष केंद्रे,मच्छिन्द्र हाडोळे,छगन दिवटे,रोहिदास जाधव,युवराज पाटोळे,कृष्णा pराठोड,अमोल पाबळे, लखन पाटोळे,नितीन सारवाव,बाळू थळ्कर, गणेश पाटोळे,शामराव राजवाडे,चेतन कासार,योगेश हिवाळे आदींसह शिवप्रेमी शासकीय नियमांचे पालन करून उपस्थित होते..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close