ताज्या घडामोडी

पाली सुधागडच्या राजकीय पटलावरील कार्यक्षम नेतृत्व म्हणजे मनसेचे सुनिल साठे

गोरगरीबांच्या मदतीसाठी सुनिल साठे झटतात अहोरात्रमनसे पाली सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांना पुढिल उज्वल राजकीय व सामाजिक कार्याच्या वाटचालीकरीता मनपूर्वक शुभेच्छा....... 

पाली सुधागडच्या राजकीय पटलावरील कार्यक्षम नेतृत्व म्हणजे मनसेचे सुनिल साठे

गोरगरीबांच्या मदतीसाठी सुनिल साठे झटतात अहोरात्र

खालापुर – दिसले  समाधान

रायगड जिल्ह्यात असंख्य राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यातून वेगळीच छाप पाडल्याने असंख्य राजकीय पुढारी तरुणाईसह श्रेष्ठ मंडळी व महिला वर्गाचे आदर्शवत नेतृत्व बनत आहे. असाच एक राजकीय नेता सर्वसामान्य जनतेचा हक्काचा व आधारस्तंभ बनला असून त्याचे नाव पाली सुधागड तालुक्याचे मनसेचे तालुका अध्यक्ष सुनिलभाऊ साठे. सुनिलजी साठे आणि सर्वसामान्यांची अशी एक नाल सोडले की, सर्वसामान्यांसाठी साठे अहोरात्र मेहनत घेत त्याचे प्रश्न मार्गी लावत त्यांना त्याचे न्याय मिळवून देत असल्याने सुनिलजी साठे प्रती सर्वसामान्यांची आदराची भावना आहे.

सुनिलजी साठे हे ग्रामीण खेड्यातून आपल्या राजकीय कारर्कीदीला सुरुवात करीत राजकारणात पाय रोवले असुन साठे यांनी आपल्या कामगिरीतून संपूर्ण रायगड जिल्ह्यात अल्पवधी काळात वेगळीच छाप पाडली. तर सर्वाना मदतीचा हात देणारे सुनिल साठे तरुणांनसह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटू लागले आहेत. त्यांनी ग्रामीण भागात केलेले उकृष्ट काम व सर्वसामान्यांना मनसेच्या माध्यमातून दिलेला मदतीचा हात पाहुन त्यांच्या दस्तुरखुद्द मनसे पक्षप्रमुख सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनी त्याच्या पाली सुधागड तालुका अध्यक्ष पदाची धुरा दिली.

मी ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो ही भावना मनातून ठेवून सुनील साठे यांनी आपल्या सामाजिक कार्याला ग्रामीण खेडेगावातून सुरूवात केली. सामाजिक कार्य करताना राजकीय पाठबळ मिळावे म्हणून यांनी राजकीय प्रवाहाला मनसेच्या माध्यमातून प्रारंभ केल्यानंतर राजकीय पटलावरून विविध समाज हिताचे काम राबवित आहेत. ही समाज हिताची कार्य पार पडताना असताना सर्वसामान्यांना आपुलकी आणि सन्मानाची वागणूक देत त्यांना वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचे व सुविधांचे महत्त्व पटवून सुद्धा देत आहेत. तर एखादे काम करताना ते स्वतःला झोकून देत कोणताही भेदभाव न करता सर्वामध्ये मिळून मिसळून जात असतात, हीच त्याची वेगळी ओळख असून राजकीय वाटचालीबरोबर सामाजिक कार्य करताना मोलाची साथ मिळाली ती त्याच्या संपूर्ण साठे परिवाराची.

तर सामाजिक कार्य करीत असताना सुनिल साठे यांनी स्वतःच्या खिशाला कात्री लावून मनात कोणताही विचार न आणता सढळ हाताने सामाजिक कार्य करीत आहेत. याच त्या सामाजिक कार्यामुळे अनेक तरुणांचे ते आदर्श राजकीय नेते बनू लागले आहेत.

तर मनसे पाली सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांना पुढिल उज्वल राजकीय व सामाजिक कार्याच्या वाटचालीकरीता मनपूर्वक शुभेच्छा…….

खालापुर -समाधान दिसले 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close