ताज्या घडामोडी

प्रशासनाच्या  दडपशाहीमुळे शेतकऱ्यावर होतोय अन्याय ; संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची शेतकऱ्याची मागणी

प्रशासनाच्या  दडपशाहीमुळे शेतकऱ्यावर होतोय अन्याय ;

संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची शेतकऱ्याची मागणी

कर्जत : विजय डेरवणकर

                        कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील तिघर धनगरवाडा येथे शेतकरी नंदकुमार देशमुख यांच्या कुटुंबीयांची सर्वे नं 18/11, 19/2, 19/6,47/6 अशी  शेत जमीन आहे .सदर जमीन वाडवडिलोपार्जीत असून गेल्या 50 ते 60 वर्षांपासून सदर जमिनीमध्ये ते भाताची लागवड करीत आहेत.या वर्षीही त्यांनी सदर जमिनीमध्ये भाताची लागवड केली होती.

 दि.8/07/2020 रोजी पळसदरी ग्रामपंचायतीने नंदकुमार देशमुख यांना पत्र पाठवले ,सदर पत्रात त्यांनी वरील सर्वे नं. मध्ये अतिक्रमण झाले आहे व सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती परंतु वरील सर्वे नं मध्ये  कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नसून  भात शेती करण्यापूर्वी बांधबंधिस्त व शेती मशागत ची काम केली असल्याचे शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद उप अभियंता बांधकाम विभाग यांनी दि 20/07/20 रोजी देशमूख   यांना स्मरण पत्र प्राप्त झाले .सदर पत्रांना उत्तर देणे क्रमप्राप्त असले तरी कोरोना कालावधी आणि लॉकडाऊनमुळे त्यांना पत्र व्यवहार करणे शक्य झाले नाही.

शेतकऱ्यांनी दि 10/10/2018 रोजी अनधिकृत रस्त्या बाबतची तक्रार उप अभियंता रायगड जिल्हा परिषद व गटविकास अधिकारी कर्जत यांना केली होती  परंतु आज दोन वर्षे उलटून देखील त्याच उत्तर प्रशासनाने दिले नाही .उलट प्रशासनाच्या पत्रांना उत्तर देण्यास

शेतकऱ्याला उशीर झाल्याने थेट कारवाई केली जाते हा कोणता न्याय म्हणावा.

           दि.7/08/2020 रोजी रायगड जिल्हा बांधकाम विभाग उपअभियंता पी.एस.गोफणे यांच्या आदेशाने अभियंता नागावकर ,पोलीस कर्मचारी , पोलीस पाटील ,आणि सरपंच यांनी शेतकऱ्याचा  मालकीसर्वे नं मध्ये कोणतीही परवानगी न घेता जेसीबी घेऊन प्रवेश केला .त्यावेळी शेतकरी आणि त्याचे कुटुंबीय शेतात उभे होते.अशावेळी भात शेतीच्या उभ्या पिकावर जेसीबी फिरवला गेला, आणि सदर आदेश कर्जत तहसीलदार देशमुख यांनी दिल्याचे सांगितले .काही क्षणातच शेतकऱ्याच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. कोरोनाचा कालावधी आणि आर्थिक संकट असताना उभ्या भात पिकावर जेसीबी फिरविण्याचा अधिकार कोणत्या कायदयात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा संबंधित कार्यालयात केली असता लोकप्रतिनिधींकडून दबाव असल्याचे सांगण्यात आले.

  शेतकरी नंदकुमार देशमुख यांनी 

त्याबाबतची तक्रार कर्जत तहसील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.परंतु सदर तक्रार

    देऊन तीन महिने उलटून शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही उलट सदर शेतकऱ्याला सरपंच ,कर्जत पोलीस ठाणे , बांधकाम  विभागाकडून जाणीव पूर्वक त्रास दिला जात असल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे. सदर  सर्वे नं मध्ये रस्ता होण्यासाठी शेतकरी व त्यांच्या वाडवडिलांनी गेल्या 50 वर्षापासून कोणतीही सहमती दिलेली नाही.तसेच भूमिअधिग्रहण कायद्या अंतर्गत शासनाने त्यांच्याशी आत्ता पर्यंत कोणताही पत्र व्यवहार केलेला नाही. वरील सर्वे नं मध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या व्येतिरिक्त कोणाचीही वहिवाट नाही , असे ते सांगतात 

त्यामुळे  भात शेतीचे नुकसान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

     दरम्यान तिघर धनगरवाडा येथील नागरिकांसाठी रस्त्या करण्यासाठी फक्त राजकारण केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तेथील नागरिकांना त्यांच्या वाडीपासून कर्जत शहराकडे जाण्याकरिता सुस्थितीत असा डांबरी रस्ता आहे. 

त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता करण्याची किव्हा त्याची शेती नादुरुस्त करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
———————————-

प्रतिक्रिया :

( गेल्या 50 ते 60 वर्षात मी किव्हा आमच्या कुटुंबीयांनी सर्वे नं 18/11, 19/2,19/6,47/6,

मध्ये रस्ता होण्यासाठी कोणतीही परवानगी किंवा एनओसी दिलेली नाही.तसेच शासनाकडून सदर रस्त्याबाबत आमच्याशी कोणताही पत्र व्यवहार केलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी अलिबाग आणि पोलीस अधीक्षक,अलिबाग यांनी संबंधीतांवर गुन्हे दाखल करावे.)

शेतकरी : नंदकुमार देशमुख,तिघर
—————–

प्रतिक्रिया :

सदर सर्वे नं हे शेतकऱ्याच्या मालकीची असून शेतकऱ्याच्या संमतीशिवाय रस्ता होऊ शकत नाही.

—  अँड . राहुल देशमुख ,कर्जत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close