ताज्या घडामोडी

मध्यधुंद पोलीस शिपाई ची दुकानदारास मारहाण,

पोलिसाबद्दल संतप्त प्रतिक्रिया

चंद्रकांत सुतार -माथेरान

 

मध्यधुंद पोलीस शिपाई ची दुकानदारास मारहाण,

पोलिसाबद्दल संतप्त प्रतिक्रिया

चंद्रकांत सुतार- माथेरान

शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास शिल्लक खाण्याच्या पानावरुन दुकानदार भिलाल महापुळे यास पोलीस शिपाई श्याम जाधव यांनी शिवीगाळ, व काठीने मारहाण केली, लॉक डाऊन नंतर 9 महिन्यांनी माथेरान हळूहळू सुरू झाले त्यातच माथेरान पर्यटन चा महत्वचा सिजन म्हणजे दिवाळी सिजनकडे पाहिले जाते, सद्या दिवाळीचे सिजन सुरू आहेच त्यामुळे सर्व व्यावसायिक आपल्या काम धंद्यात व्यस्त असताना शुक्रवारी रात्री 11 वाजता शिल्लक कारणावरून पोलीस शिपाई श्याम जाधव यांनी दुकानादार भीलाल महापुळे यांस मारहाण केली, दुकानदार भिलाल महापुळे हे आपले पानांचे दुकान बंद करून घरी निघाले असताना तेथे मध्यधुंद अवस्थेत पोलीस शिपाई श्याम जाधव आले नी भिलाल भिलालकडे पानाची मागणी केली , त्यावर भिलाल यांनी त्यांना पानांची कात व चुना ची भांडी आता धुतली आहे , दुकान बंद झाले आहे, तरी दुसरे काही पाहिजे असेल तर देतो असे सांगितले असता , जाधव शिपाई यांनी दुकानंदार भिलाल यांना शिवीगाळ करत, काठीने मारहाण केली, पोलीस शिपाई यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांच्या सोबत असलेल्या कॉन्स्टेब जोशी यांनी समजविण्याचा प्रयन्त केला, परंतु जाधव काहही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, रात्री याबाबत सर्व जमाव जमल्याने जाधव पोलीस यांची मेडिकल करन्यासाठी माथेरान बी जे हॉस्पिटलमध्ये जात असताना या सर्व घटनेचे वृत्तांत करण्यासाठी येथील महाराष्ट्र माझा चे प्रतिनिधी दिनेश सुतार गेले असता त्यांनाही जाधव यांनी धक्का बुक्की केली, पत्रकार दिनेश सुतार यांनी तशी लेखी तक्रार माथेरान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे, पोलिसच जर शिल्लक कारणाने दारूच्या नशेत असे नागरिकाना त्रास द्यायला लागले तर नक्की विश्वास ठेवायचा कोणावर, एखाद्या पोलिसाच्या अश्या कृत्या मुळे संपूर्ण पोलीस शब्दात , विभागाला मान खाली घालावी लागते, बदनाम होत आहे, सकाळ पासून सोशल मीडियावर सर्वत्र पोलीसाचा निषेध निषेध सुरू आहे.
—————————————
20 तारीख शुक्रवारी रात्री झालेल्या घटनेची माहिती वरिष्ठ अधीकाऱ्यांना कळविली आहे त्याबाबत वरिष्ठ अधिकारी योग्य ती कारवाही करतील

प्रशांत काळे, API , माथेरान पोलीस स्टेशन
—————————————-
माथेरान व्यापारी संघटनेचे सदस्य बीलाल महापुळे याच्यावर झालेल्या अन्याया बाबत व्यापारी संघटना त्याच्या पाठीशी सक्षम उभी आहे आम्ही माथेरान पोलीस स्टेशनचे सहाय्यक प्रशांत काळे साहेबांशी बोलणे केले असून पोलीस शिपाई श्याम जाधव यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे,
राजेश चौधरी-अध्यक्ष व्यापारी संघटना, माथेरान
—————————————-

 

 

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close