ताज्या घडामोडी

रुबी मिल्स व्यवस्थानाचा मुजोरपणा आता खपवून घेतला जाणार नाही – शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे

 

रुबी मिल्स व्यवस्थानाचा मुजोरपणा आता खपवून घेतला जाणार नाही – शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे

खालापुर – समाधान दिसले

खालापूर तालुक्याला औद्योगिक वसाहतीचे माहेरघर म्हटलं जातं. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे असंख्य प्रकारचे कारखाने असून अनेकांना या कारखान्याच्या जोरावर रोजनदारी मिळत आहे. परंतु काही निवडक कारखानदार व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करीत असल्याने कामगारांमध्ये त्या – त्या कारखानदार व्यवस्थापनाबाबत नाराजीचा सूड उमटत असतो. कामगार आपल्याला न्याय मिळावा म्हणून अनेक प्रकारचे आंदोलन छेडत असतात, मात्र काही कारखानदार आपला मुजोरपणा कायम ठेवत कामगारांवर दडपशाही लादत आहेत. अशीच तालुक्यातील खरसुंडी येथील दि.रुबी मिल्स व्यवस्थापन कामगारांची असंख्य प्रकारची पिळवणूक करीत स्थानिक कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देत कामगारांना कामापासुन वंचित ठेवणे, महिला भगिनीवर अन्याय करणे तसेच स्थानिक शेतकरी यांची जमीन लाटणे यासहीत स्थानिक ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारी कंपनी व्यवस्थापनाबाबत येत असल्याने या मुजोर व्यवस्थापनाला वठणीवर आणण्यासाठी खालापुर तालुका शिवसेना – युवासेना आक्रमक झाली असून जर कंपनी व्यवस्थापन नम्रतेने वागली नाहीतर युवासेना – शिवसेना स्टाईलने आंदोलन येत्या काही दिवसात छेडण्यात येणार असून त्या आशयाचे निवेदन शिवसेना तालुक्याच्या वतीने खालापुर तहसिलदार इरेश चप्पलवार, डि.वाय.एस.पी संजय शुक्ला, खालापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांना दिले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, रुबी मिल्स व्यवस्थानाचा मुजोरपणा आता खपवून घेतला जाणार नाही तसेच व्यवस्थापनाला जशाच तसे उत्तर शिवसेना स्टाईलने देऊ असे विचारे म्हणाले.

रुबी मिल्स व्यवस्थापन आणि कामगार – स्थानिक ग्रामस्थ याचा संघर्ष खूप वर्षापासून सुरू असल्याने ही कंपनी नेहमीच तालुक्यात चर्चेचा विषय बनत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत अनेक जण नाराजी व्यक्त करीत असून कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा वठणीवर आणण्यासाठी आता खालापूर तालुका शिवसेना – युवासेना मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

स्थानिक कामगार व ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवर शिवसेना आक्रमक झाली असुन या तक्रारीमध्ये स्थानिक कामगारांना जाणूनबुजून काम पासुन वंचित ठेवणे, स्थानिक कामगार कामावरून काढून परप्रांतिय कामगार भरणे, स्थानिक महिला भगिनिवर कंपनी व्यवस्थानाकडून होणारा त्रास व अन्याय, कामगारांच्या हक्काच्या पगारातून हेतु परस्पर पगार कपात करणे, शेतकऱ्यांच्या जामिनी लाटण्याचा प्रयत्न करणे, जमिनिबाबत शासनाची फसवणूक करणे, स्थानिक कामगारांविरुध्द कटकारस्थान रचून कामगार कपात करणे, केमिकल युक्त पाणी नदीपात्रात सोडून नदीपात्र दुषित झाले असून त्याचा वास हा स्थानिक ग्रामस्थांना होत आहे व यामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होत
आहे. अशा एक ना अनेक तक्रारी कंपनी व्यवस्थापनाबाबत होत असल्याने कामगार व ग्रामस्थ यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याने कंपनी व्यवस्थापनाला वेळीच धडा शिकवण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असुन आता शिवसेना विरुध्द कंपनी व्यवस्थापन असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.

जर कंपनी व्यवस्थापन नम्रतेने वागली नाहीतर युवासेना – शिवसेना स्टाईलने आंदोलन येत्या काही दिवसात छेडण्यात येणार असून त्या आशयाचे निवेदन शिवसेना तालुक्याच्या वतीने खालापुर तहसिलदार इरेश चप्पलवार, डि.वाय.एस.पी संजय शुक्ला, खालापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते दिले असुन यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, माजी तालुकाप्रमुखखि गावंड, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, महिला तालुका संघटिका रेश्मा आंग्रे, युवासेना विभाग अधिकारी गणेश मोरे आदी उपस्थित होते.

चौकट –
रुबी मिल्स कंपनी व्यवस्थानाच्या मनमानी कारभाराबाबत अनेकदा कामगार व स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे मुजोर व्यवस्थापनाला धडा शिवसेना स्टाईलने शिकवण्याची वेळ आली असून जो पर्यंत भूमीपुत्रांना न्याय मिळत नाही तो प्रयत्न आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे व आता रुबी मिल्स व्यवस्थानाचा मुजोरपणा कधापी खपवून घेतला जाणार नाही.
संतोष विचारे
(शिवसेना तालुकाप्रमुख)

 

चौकट –
तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असतानाही येथील असंख्य भुमीपुत्र अजूनही बेरोजगार आहेत. याचे मुख्य कारण की कंपनी व्यवस्थापन मुजोर आणि मनमानी कारभार हाताळणारे अधिकारी वर्गाचे पालन करीत भुमीपुत्रांवर अन्याय करण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून करीत आहेत. आता या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युवासेना – शिवसेना मैदानात उतरली असून मुजो र व्यवस्थापनाला त्यांची जागा दाखवून देऊ. भुमीपुत्रांच्या हक्कासाठी आम्ही शिवसैनिक सर्वस्व पणाला लावू हे निश्चित.
महेश पाटील
(युवासेना तालुका अधिकारी )

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close