ताज्या घडामोडी

लासलगाव येथील एकाही सफाई कर्मचाऱ्यावर आकसापोटी कारवाई झाल्यास रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेङणार- महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचा इशारा.

 

लासलगाव येथील एकाही सफाई कर्मचाऱ्यावर आकसापोटी कारवाई झाल्यास रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेङणार- महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचा इशारा.

सफाई कर्मचार्‍यांच्या संपास रि.पा.ई (आठवले)पक्षाचे समर्थन..
नाशिक शांताराम दुनबळे यांजकडून.
नाशिक-: नाशिक जिल्हा ग्रामपंचायत ग्रामपालिका कामगार कर्मचारी संघटना लासलगाव यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सी.ओ.माननीय लिनाताई बनसोड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की लासलगाव शहर विकास समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्मचाऱ्यांची हेतु पुरस्कार बदनामी करून कामावरून काढुन टाकू अश्या धमक्या देत आहे तसेच कोवीड १९ ह्या आजारामध्ये जीवाची पर्वा न करता लासलगाव स्वच्छ ठेवण्याचे कार्य केले असून सुद्धा शबासकी देण्याऐवजी कामावरून काढण्याचे धमक्या दिल्याने उद्या दिनांक १९,२० पर्यंत कर्मचारी संपावर जाणार असल्याचे निवेदन कर्मचाऱ्यांनी सी.ओ. मॅडमला सांगितले… आकसापोटी कुठल्याही प्रकारची कारवाई
कर्मचाऱ्यांवर झाल्यास कृपया आठवले पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन
छेडू व उद्याच्या संपास रिपाई चा पाठिंबा असल्याचा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी कळविले आहे…

याप्रसंगी रिपाई(आठवले)पक्षाचे लासलगाव शहर अध्यक्ष मा.रामाभाऊ शेजवळ, कामगार नेते प्रकाश खलसे,कामगार नेते बाळू घोरपडे, राजू गुलाब लखन,संतोष खलसे,रवि पाधरे, शाहुबाई पाधरे, शांताबाई पाधरे, युवा नेते दिपकभाऊ डोके, युवा नेते नवीनजी नन्नावरे,युवा उपाध्यक्ष आकाश नानु साळवे,प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close