ताज्या घडामोडी

कर्जत चारफाटा मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा काही काल वाहतूक ठप्प.

कर्जत चारफाटा मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा

काही काल वाहतूक ठप्प.

कर्जत : विजय डेरवणकर

कर्जत चारफाटा मुख्य रस्त्यावर दिवाळीच्या निमित्ताने चाकर मण्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्यामुळे कर्जत मुख्यरस्त्यावर वाहनांचा चक्काजाम झालेला दिसून येत आहे.
कर्जत तालुका हा कृषी प्रधान तालुका असल्यामुळे पुणे, मुंबई, दिल्ली अन्य शहरातील मोठमोठ्या धनिक, सेलिब्रेटींचे तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे काही एकरमध्ये मोठं मोठे फार्महाऊस आहेत. तर हे सर्व जण जीवनातील आनंद मौजमजा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात मनमोकळं करण्यासाठी दिवाळी गणपती नवरात्र थर्टीफस आदी सणाला कर्जत तालुक्यात येत असून दिवाळी सणालाही कर्जत तालुक्यात हे सर्व जण आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली असून दिवाळी भाऊबीजच्या मुहुर्तावर कर्जतला तालुक्याला अधिकची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याने कर्जत चारफाट्यावर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काल ठप्प झाल्याचे पाहायला मिळाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली होती.
कर्जत तालुक्याला असंख्य कारणाने संपूर्ण महाराष्ट्रभर हा तालुका परिचित असून हा तालुका निसर्गाच्या सौदंर्याने विविध ढंगात रंगलेला असल्याने या तालुक्याकडे सर्वाचे पाय आपोआप वळत असल्याने या तालुक्याचा सर्वाना हेवा वाटत असतो. या तालुक्याची वाढती लोकप्रियता वाहता याठिकाणी असंख्य धनिक – सेलिब्रिटी या तालुक्यात काही आनंदाचे क्षण निवांत घालवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी येत असतात. आता नुकतीच दिवाळीची सुट्टी असल्याने अनेकांनी आपले पाऊले कर्जतकडे वळवल्याने नोव्हेंबर रोजी कर्जत चारफाट्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने पाहायला मिळाल्याने काही काळ वाहन चालकांची तारांबळ उडाली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close