ताज्या घडामोडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन किमीपर्यंत रांगा, गाड्या विनाटोल सोडल्याने ट्राफिक जाम आटोक्यात

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन किमीपर्यंत रांगा, गाड्या विनाटोल सोडल्याने ट्राफिक जाम आटोक्यात

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला

खालापूर – समाधान दिसले

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुण्याला निघालेल्या मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Express Way) वर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. ट्राफिक जाम सोडवण्यासाठी अखेर काही वाहनं टोल न घेता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रविवारला जोडून भाऊबीज – पाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे. मुंबई आणि ठाणेकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळच्या सुमारास दीड ते दोन किमी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. खालापूर टोलनाक्यावरुन पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या टोल न घेता सोडल्या गेल्या. त्यानंतर मुंबई पुणे महामार्गावरील वाहन कोंडी काहीशी आटोक्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close