महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवती व युवक कॉग्रेसच्या वतीने आदिवासी बांधवाना दिवाळी निमित्ताने अनोखी भेट

एक करंजी सुखाची हा स्त्युत्य उपक्रम*

राष्ट्रवादी युवती व युवक कॉग्रेसच्या वतीने आदिवासी बांधवाना दिवाळी निमित्ताने अनोखी भेट

क करंजी सुखाची हा स्त्युत्य उपक्रम*

खालापूर – समाधान दिसले

पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक व युवती कॉग्रेस तसेच सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाळी सणाचे औचित्य साधुन “एक करंजी सुखाची” हा उपक्रम रोहा तालुक्यातील नीवी, लांढर व भुनेश्वर आदिवाशी येथील बांधवांसोबत त्यांना दिवाळी फराळाचे वाटप त्याच बरोबर अंधारातुन प्रकाशाकडे येण्याच्या दृष्टीने दिव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 14 नोव्हेंबर *Children’s Day* चा योग जुळुन आल्याने आदिवाशी वाडीतील विद्यार्थी वर्गाला वही, पेन त्याच बरोबर चॉकलेटचे वाटप सुद्धा करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला रायगड जिल्हा युवती राष्ट्रवादी कोंग्रेस अध्यक्षा ॲड.सायलीताई दळवी, त्याच बरोबर रोहा तालुका युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्या व ज्यांच्या सहकार्याने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते तालुका युवक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयवंत दादा मुंढे, लांढर ग्रामपंचायतचे सरपंच सतिशजी भगत, वरसे ग्रामपंचायत उपसरपंच अमितजी मोहिते, जगदिश भगत,राकेश बामुगडे, पत्रकार राजेंद्र जाधव, रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे सचिव डॉ.अनंतजी खराडे, रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, रोहा तालुका विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष शंतनु रटाटे ,रोहा शहर युवती अध्यक्ष रुचिका जैन, उपाध्यक्ष असावरी मोकल, मयूरी काणेकर तसेच पक्षातील जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close