आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडी

भुजबळांच्या प्रयत्नातुन येवला तालुका टँकर मुक्त होणार : बाळासाहेब लोखंडे

भुजबळांच्या प्रयत्नातुन येवला तालुका टँकर मुक्त होणार : बाळासाहेब लोखंडे

सायगाव : महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामुळे दुष्काळ्ग्रस्त येवला तालुक्याची ओळख बदलली असून उर्वरीत टंचाईग्रस्त गावे लवकरच टँकर मुक्त होणार असल्याची माहिती भुजबळांचे स्वीय साह्यक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. भुजबळांच्या प्रयत्नातुन येवला तालुक्यातील सायगाव, दत्तवाडी येथील मुलभुत सुविधे अंतर्गत सभामंडपाच्या भुमीपुजन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लोखंडे बोलत होते.
१९७२ पासून येवला तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून होती. दरवर्षी नोहेंबर -डिसेंबर पासून निम्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असे. ट्रँकरच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना नियमित संघर्ष करावा लागायचा. पण मतदारसंघात भुजबळांच्या नेतृत्वामुळे ३८ गाव नळ पाणी योजना कार्यान्वीत झाली. त्याची व्याप्ती वाढत जावून ५९ गावांना आज पाणी पुरवठा होत आहे.भुजबळांच्या प्रयत्नातुन राजापूर गटात ४२ गावची स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला मंत्रीमंडळ बैठकित मंजुरी मिळाली असुन लवकरच ही योजना आकाराला येणार आहे. त्याचबरोबर धुळगाव परिसरातील ११ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजनाही साकार होवून येवला तालुका टँकरमुक्त करण्याचा संकल्प भुजबळांनी केली असल्याची माहिती भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. सायगाव येथे भुजबळांच्या प्रयत्नातुन मुलभूत सुविधा अंतर्गत पंधरा लाखाच्या निधीतुन साकार होणाऱ्या सभामंडप भुमिपुजन कार्यकम प्रसंगी बाळासाहेब लोखंडे, नाशिक जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, लोंढे नाना, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे येवला मा. उपाध्यक्ष अँड. सुभाष भालेराव मा.सरपंच शहादराव भालेराव, मा.सरपंच काशिनाथ ढाकणे, मा.सरपंच गणपत खैरणार, मा.सरपंच सुदाम भालेराव यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न झाले. याप्रसंगी योगेश गंडाळ, तरंग गुजराथी, ऍड कुलकर्णी, आकाश नागरे, वसंतराव खैरनार, बशीर भाई शेख, संजय पेंढारे, शरद भालेराव, अरूण भालेराव, प्रभाकर उशीर, किरण भालेराव, कारभारी गाडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close