ताज्या घडामोडीसांस्कृतिक

महिला पोलिस तेजस्विनी जयेंद्र भगत यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने आश्रम शाळेत साजरा केला आपला वाढदिवस

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण

महिला पोलिस तेजस्विनी जयेंद्र भगत यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने आश्रम शाळेत साजरा केला आपला वाढदिवस

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण

खालापूर – समाधान दिसले

पोलीस म्हटलं की आठवते ती कडक शिस्त. पण या पोलिसांच्याही मनात एक निरागसता आहे, एक साधेपणा आहे, आणि एक आपुलकीपणा असल्याने अनेक जण पोलिसांना खाकी वर्दितील देव माणूस म्हणून संबोधित असतात. पोलिसांनाही सामाजिक घटकाबद्दल आदरयुक्त भावना असल्याने असंख्य पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी आपल्या आनंदाचे क्षण गोरगरीब जनतेच्या सहवासात घालवत असून अशीच महाराष्ट्र पोलिस दलात महिला पोलिस म्हणून कार्यरत असणाऱ्या तेजस्विनी जयेंद्र भगत यांनी आपला वाढदिवस आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरी केल्याने यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असुन याप्रसंगी विद्यार्थ्यांना भगत यांनी वेगवेगळ्या भेटवस्तु देत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालिकरीता शुभेच्छा दिल्या.

पोलिस म्हटलं की ‘ऑन ड्युटी २४ तास’ हे समीकरण समोर येतं. ही नोकरीच तशी आहे. त्यामुळे कर्तव्य निभावताना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना सणवारादिवशीः ड्युटीवर राहावे लागते. बऱ्याचदा कुटूंबासोबत, नातेवाईकांसोबत त्यांच्या आनंदात सामिल होता येत नाही. तर काही वेळ त्यांच्या वाढदिवसाबाबतही हीच स्थिती उद्भवते. वाढदिनी सुट्टी मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे वाढदिवस हा तसा अनेक पोलिसांच्या नशिबी बऱ्याचदा नसतोच. परंतु काही पोलिस वर्ग आपल्या वाढदिवस दुसऱ्या दिवशी साजरा करीत आपला वाढदिवसाचा दिवस द्विगुणीत करित असून महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या युवा पोलिस तेजस्विनी जयेंद्र भगत यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने आश्रम शाळेतील विद्यार्थी वर्गाच्या सहवासाता साजरा केल्याने यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला तर सर्व विद्यार्थी वर्गानी महिला पोलिस तेजस्विनी मँडम भगत खूप खूप शुभेच्छा देत पुढच्या वर्षीहि आमच्या सहवासात वाढदिवस साजरा करा अशा भावना व्यक्त केल्या..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close