ताज्या घडामोडी

खालापूरात शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न.

खालापूरात शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न.

खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली बेठक

खालापूर – समाधान दिसले
    

खालापूर शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे व खोपोली शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक, गटनेते सुनिलभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुका व खोपोली शहर, खालापूर शहर शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक 10 नोव्हेंबर रोजी पार पडली असून यामध्ये तालुक्यातील पदाधिकारी वर्गासह महिला पदाधिकांऱ्याच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य ती सविस्तर चर्चा करण्यात आल्याने काही काळ बैठकीमध्ये रंगत चढल्याचे पाहायला मिळाले.
  
शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी खालापूर तालुका, खोपोली शहर व खालापूर शहर यांच्या उपस्थितीत दिनांक 10 नोव्हेंबर रोजी ठीक 4 वाजता खालापूर रेस्टहाऊस येथे खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख, महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी इत्यादी सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची मिटिंग संपन्न झाली असून यामध्ये आदरणीय हिंदूहदयसम्राट श्रीमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्या संदर्भात नियोजन करीत तालुक्यातील विविध इतर विषयावर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, खोपोली शहरप्रमुख तथा नगरसेवक, सुनिल पाटील, तालुका समन्वयक एकनाथ पिंगळे, माजी तालुकाप्रमुख सुरेश कडव, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, शिवसेना नेते हरेश काळे, नगरसेवक अमोल जाधव, विभागप्रमुख पदमाकर पाटील, रोहिदास पिंगळे, मंगेश पाटील, एस.एम.पाटील, तांबाटी सरपंच अनिल जाधव, अशोक मराजगे, जनार्दन पाटील, प्रसिध्दीप्रमुख भाऊ सणस, संदेश पाटील, जितू दळवी, रमेश म्हामुणकर, राकेश गायकवाड, राहुल आंग्रे, महिला तालुका संघटीका रेश्मा आंग्रे, सुविधा विचारे, सारिका निकम, रेश्मा कदम, संगिता महाब्दी, सिमा सुर्वे, वैजयंती गायकवाड आदीप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close