ताज्या घडामोडी

खालापूर युवासेना तालुका पदाधिकारी आढावा बैठक संपन्न,

तालुक्यातील असंख्य प्रश्नावर करण्यात आली सविस्तर चर्चा

खालापूर युवासेना तालुका पदाधिकारी आढावा बैठक संपन्न,

तालुक्यातील असंख्य प्रश्नावर करण्यात आली सविस्तर चर्चा

खालापूर – समाधान दिसले

गेल्या काही महिन्यापासून कोरोना महामारीने सर्वाना हतबळ केल्याने अनेकांमध्ये नाराजी होत असून खालापूर तालुक्यातील युवासैनिकांची मरगळ झटकून काढण्यासाठी तालुका स्तरावरील युवासैनिक पदाधिकारी वर्ग कामाला लागले असल्याने युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर व तालुका अधिकारी महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पदाधिकारी आढावा बैठक 8 नोव्हेंबर रोजी खालापूर येथे पार पडल्याने युवासेना पदाधिकारी यांनी आपआपल्या परिसरातील प्रश्नावर चर्चा केल्याने बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याने युवासैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

खालापूर तालुका युवासेना पदाधिकारी वर्गाची बैठक 8 नोव्हेंबर रोजी खालापुर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली असून यामध्ये कोरोना काळात तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा, गाव पातळीवरील नवनियुक्त्या व नामफलक अनावर विषयी चर्चा, तालुक्यातील बेरोजगारीत तरुणांवरील समस्या, युवासेना मार्फत विविध उपक्रम राबविण्या विषयी चर्चा अशा असंख्य प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आल्याने युवासेना पदाधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, खालापूर तालुका अधिकारी महेश पाटील, उपतालुका अधिकारी रुपेश चोगले, चिटणीस प्रसाद देशमुख, सहसमन्वयक रोशन पाटील, विभाग अधिकारी तेजस पाटील, अतुल पाटील, अक्षय दिसले, जगदीश भोईर, नितीन पाटील, अभय घोसाळकर, जयेश पाटील, निखिल मालूसरे, गिरीश जोशी, रोहीत पाटील, गणेश मोरे, मयुर पाटील आदी प्रमुखासह तालुक्यातील युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तालुका अधिकारी महेश पाटील यांनी पदाधिकारी वर्गाला मार्गदर्शन करताना संबोधले की, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेने बरोबर युवकांचे प्रश्न जाणून घेत आपल्या माध्यमातून कसे सुटतील यावर लक्ष केंद्रित करा. तसेच एखाद्यावर अन्याय होत असेल, त्यांना युवासेनेचा दणका दाखवत अन्यायाला वाचा फोडा. तर पुढे बोलताना म्हणाले की, युवासेनेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close