ताज्या घडामोडी

कंटेंटमेंट झोन व सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यावर बंदी.नियमांचे भंग केल्यास कडक कारवाई केली जाईल. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक*

*कंटेंटमेंट झोन व सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यावर बंदी.नियमांचे भंग केल्यास कडक कारवाई केली जाईल. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे नाशिक –

दिवाळीच्या खरेदीसाठी लोक रस्त्यावर उतरल्याने कोरोनाची संभाव्य दुसरी लाट टाळण्यासाठी प्रशासन सजग झाले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहर आणि जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ हा नियम अनिवार्य केला असून, मास्क नसताना दुकानात प्रवेश केल्यास कारवाई होणार आहे.
*नाशिक जिल्ह्यात कलम १४४ लागू*
नाशिक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळी खरेदीनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर कोविड प्रतिबंधित उपाययोजनांबाबत प्राधिकरणाची बैठकीत ‘नो मास्क, नो एन्ट्री’चा निर्णय घेण्यात आला.बैठकीत प्राधिकरणाने संभाव्य उपाययोजना राबविताना नाशिक शहरात फौजदारी दंडप्रक्रिया संहितेनुसार कलम १४४ लागू केला आहे. आठवडेबाजार, जनावरांचे बाजार सुरू ठेवताना बाजारात कोरोना प्रतिबंधासाठी सामाजिक अंतर, मास्कचा वापर आदी नियम संबंधितांवर बंधनकारक असणार आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये फटाकेबंदी
सगळीकडे दिवाळीच्या खरेदीला वेग आला आहे. आगामी काळात कोरोना संसर्गाची संभाव्य लाट येण्याची भीती वर्तविली जात असताना दिवाळीत वायू प्रदूषणाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. संसर्गात वाढ टाळण्यासाठी वायूप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर नियंत्रण आणले आहे. कंटेन्मेंट झोन आणि शांतता क्षेत्रात (रुग्णालय, न्यायालय, शाळा आदी), सार्वजनिक ठिकाणी मंगळवार (ता. १०)पासून वायूप्रदूषण करणारे कोणतेही प्रकारचे फटाके वाजविण्याला पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे.- सार्वजनिक ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’
– 👉कंटेन्मेंट झोनमध्ये व सार्वजनिक ठिकाणी फटाक्यास प्रतिबंध
– 👉नाशिक शहर-जिल्ह्यात कलम १४४ लागू
– 👉अंतर राखून आठवडेबाजारांना परवानगी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close