ताज्या घडामोडी

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या शेडूंग टोल नाक्यावर स्थानिकांना टोल मुक्ती मिळावी – महासचिव रायगड जिल्हा जनता दल विजय खारकर

शेडुंग, बोर्ले पनवेल बायपास येथील मार्गावर सर्व स्थानिक वाहनधारकांना (MH46) टोल मुक्ती मिळावी यासाठी पाठपुरावा सुरूच

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या शेडूंग टोल नाक्यावर स्थानिकांना टोल मुक्ती मिळावी – महासचिव रायगड जिल्हा जनता दल विजय खारकर

खालापूर – समाधान दिसले

शेडुंग टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती मिळावी या करिता जनता दल रायगड जिल्ह्याच्या वतीने सातत्य पूर्ण पाठपुरावा सुरू केलेला असून जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.सुहास बने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष अँड डॉ.सचिन पाटील यांच्या आदेशाने जनता दलाने यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील शेडुंग, बोर्ले पनवेल बायपास येथील मार्गावर सर्व स्थानिक वाहनधारकांना (MH46) टोल मुक्ती मिळावी यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. दिनांक ३ नोव्हेम्बर २०२० रोजी रायगड जिल्ह्याचे जनता दलाचे महासचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विजय खारकर यांनी बांद्रा येथील हेड ऑॕफिसला भेट देऊन स्थानिक नागरिकांना होणाऱ्या समस्यांविषयी माहिती संबंधित अधिकारी वर्गाला देत स्थानिकांकडून घेण्यात येणारी टोल वसुली थांबवावी अशी मागणी खारकर यांनी केली.

खालापूर आणि पनवेल तालुक्यातील गावांच्या हद्दीतून मुंबई पुणे महामार्ग क्रमांक ४ व यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग हे दोन्ही महामार्ग जातात. आणि यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आय.आर.बी या कंपनीकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. सदर टोल वसुली नाके हे ज्या गावांच्या 10 किमी मध्ये बांधले आहेत. त्या ठिकाणावरील इतर रस्त्यावर असलेले खड्डे, रस्त्यांचे चालू असलेली कामे व उड्डाणपुलाचे चालू असलेल्या कामामुळे पनवेलपर्यंत जाण्यास तसेच पनवेलच्या पुढे जाण्यास ट्रॅफिकमुळे खूप वेळ लागतो म्हणून नागरिकांची गैरसोय होऊ नये. म्हणून तसेच गावातील लोकांना व्यवसाय, नोकरी व मूलभूत गरजांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा जसे बाजारहाट, शासकीय कार्यालये , शाळा, कॉलेज, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी रोजच्या कामासाठी सतत या रस्त्याचा वापर करत असतात.

तरी या मार्गावरील शेजारील 10 किमी हद्दीतील गावातील वाहनांना टोल मुक्ती मिळावी या साठी जनता दलाचे रायगड जिल्हा महासचिव विजय खारकर यांनी अनेक प्रकारे पत्रव्यवहार करत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे नुकतेच विजय खारकर यांनी सांगितले. त्यामुळे जनता दल रायगडचे पदाधिकारी तसेच विजय खारकर यांच्यामुळे सर्व सामान्य जनतेला टोल वसुलीच्या जाचा पासून दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close