ताज्या घडामोडी

वर्षानूवर्ष अन्याय,अत्याचार सहन करुनही,सामाज गुन्हेगार ठरवी खोटा ! मात्र चित्रपट महामंडळाच्या खुर्चीवर विराजमान,आज पारध्यांचा बेटा !! अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता मंडळाच्या उपाध्यक्षपदी , सुनील भोसले,

वर्षानूवर्ष अन्याय,अत्याचार सहन करुनही,सामाज गुन्हेगार ठरवी खोटा !
मात्र चित्रपट महामंडळाच्या खुर्चीवर विराजमान,आज पारध्यांचा बेटा !!

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता मंडळाच्या उपाध्यक्षपदी , सुनील भोसले,

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे

डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीच्या चोकटीत,अडकवू ,नका ते सर्वव्यापी ,आहेत,आशा या महामानवाला क्रांतीकरी मनाचा मुजरा,
रांजले,गांजले सोशित वंचितांचे दुःख: हरण्याकरीता विश्वविख्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत मोठी तरतूद निर्माण करत दिनदुबळ्यांना त्यांचे हक्क अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले हे सर्वश्रृत आहे,
शासनस्तरावरुन उपेक्षित सामाजाच्या उन्नतीसाठी अनेक जनकल्याणकारी योजना असल्यातरी त्या तळागळातील उपेक्षित आणि दुर्लक्षित सामाजापर्यंत पोहोचणे मोठे दुरापास्त असते व आहे त्यातीलच पारधी समाज हा वर्षानूवर्ष शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांपासून वंचितच राहिला आहे,या समाजाच्या थोडंफार शिकलेल्या व्यक्ती जरी नोकरी व्यावसायात असल्यातरी ही संख्या आगदी नगण्य आहे तथा शहरात कमी आणि दुर्गम भागात अधिक अशा स्वरुपातील असलेला या समाजाचा आजतगायत म्हणावा तसा विकास देखील झालेला नाही,आजही इतर समाज या समाजास गुन्हेगारीच्या माध्यमातून बघतो हे अत्यंत चुकीचे आहे,सामाजाने आतातरी या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा ,या समाजातील शैक्षणिक अभावामुळे मागासलेपणा अधिक असल्याने तथा समाजातील रुढी परंपरा आजही कायम असल्याने, या सामाजास मुख्य प्रवाहात आनण्यासाठी शासनस्तरावरुन आणखी प्रयत्न होणे गरजेचे ठरत आहे, तथा या समाजातील ज्या काही शिक्षित व्यक्ती आहेत त्यांनी पुढाकार घेणे देखील क्रमप्राप्त ठरत आहे, असे विदारक चित्र या सामाजाचे असलेतरी याच समाजातील “सुनील ज्ञानदेव भोसले” यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज,महामानव डॉ. बाबासाहेब आ़बेडकर यांच्या पुण्याईच्या बळावर तथा माता-पितांच्या आशिर्वादाने इलेक्ट्रॉनिक अॅंड प्रिंट मिडियातील पत्रकारीताच्या माध्यमातून सामाजमाध्यमांत आपलं एक मानाचं स्थान प्राप्त केलं आहे,सध्या स्टार टीव्ही ९ चे संपादक तर दैनिक मराठवाडा केसरीचे ते प्रतिनिधी आहेत यासोबतच त्यांनी विविध सामाजोपयोगी उपक्रम राबविल्याने नवी दिल्ली येथून राष्ट्रीय गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार असे विविध पुरस्काराने त्यांना तब्बल १८ राज्यांमधून गौरविण्यात आले आहे,तसेच कोरोनाकाळात लॉकडाऊनवेळी अनेक गोर-गरीब उपेक्षितांना त्यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांना मोठा धीर मिळाला, आणि केवळ ते येथेच न थांबता “अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातील”उपाध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमानही झाले आहेत,
नुकताच त्यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ( DPIAF) कडून कोविड योद्धा २०२० पुरस्कारही जाहीर झाला आहे, पारधी समाजातील एक युवक वडीलधार्या़च्या पुण्याई आणि आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर जेव्हा आगेकूच करतो तर त्याचा आदर्श घेत इतरही समाज बांधवांनी स्वत:ला सक्षम बनवत स्वत:चं सादरीकरण केल्यास कोणताच समाज उपेक्षित आणि दुर्लक्षित राहणार नाही हेच याठिकाणी अघोरेखीत होते.

राजेंद्र,दूनबळे,पत्रकार,शिर्डी, संकलन
शौकतभाई शेख, शब्दांकन, श्रीरामपूर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close