ताज्या घडामोडी

माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन शटल सेवा आजपासून ( बुधवार )

माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन शटल सेवा आजपासून ( बुधवार )

माथेरान- चंद्रकांत सुतार

माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन शटल सेवा आजपासून

माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन शटल सेवा आजपासून ( बुधवार )

कोविड काळात माथेरान बंद झाल्यानंतर काही दिवसात मिनिट्रेन सुद्धा बंद करण्यात आली.तेव्हापासून आत्तापर्यंत मिनिट्रेन बंद होती.2 सप्टेंबरला माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक माथेरान मध्ये येऊ लागले.पण अमन लॉज ते माथेरान हे दोन किलोमीटर अंतर चालताना पर्यटकांची दमछाक होत होती.त्यामुळे पर्यटकांनी आपल्या व्यथा स्थानिक प्रशासनास सांगितल्या.व मिनिट्रेन सुरू करण्याबाबत आग्रह धरला.त्यानुसार स्थानिक प्रशासनाने मागणी केल्यानंतर ही मिनिट्रेन शटल सेवा पर्यटकांच्या सेवेसाठी आज(बुधवार 4 नोव्हेंबर) पासून धावणार आहे.

पर्यटकांनी मागणी केल्यानंतर येथील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनिट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.पण प्रशासनाने राज्य शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले.तेव्हा राज्य सरकारने मिनिट्रेन सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता.त्यानुसार तब्बल आठ महिन्याच्या प्रतिक्षे नंतर माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन 3 द्वितीय श्रेणी,1 प्रथम श्रेणी आणि 2 मालवाहू बोगीसह पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार असे मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

————————————–

मिनिट्रेन चे वेळापत्रक :

माथेरान ते अमन लॉज:-सकाळी 9:30 आणि सायंकाळी 4 वाजता

अमन लॉज ते माथेरान:-सकाळी 9:55 आणि सायंकाळी 4:25

—————————————————————

मिनीट्रेनचा इतिहास

ब्रिटिश काळात 1901 मध्ये त्यावेळचे प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय यांनी स्वखर्चाने नेरळ ते माथेरान मिनीट्रेन साठी रेल्वे मार्ग बांधण्याचे ठरविले. सात वर्षात या रेल्वे मार्गाचे काम  1907 मध्ये पूर्ण झाले. या रेल्वे मार्गासाठी त्यावेळी तब्बल सोळा लाख रुपये खर्च आला होता. स्वातंत्र्यानंतर नेरळ- माथेरान मिनीट्रेन रेल्वे मार्ग हि भारत सरकारच्या अखत्यारीत आला. 1983  मध्ये वाफेची इंजन बंद होऊन त्या ऐवजी डिझेल इंजिनचा वापर केला जाऊ लागला.
—————————————-

2005 च्या अतिवृष्टीचा फटका

  1. 2005मध्ये झालेल्या अतिवृष्टीत माथेरान घाटातील रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे सुमारे दीड वर्षापेक्षा अधिक काळ रेल्वे मार्ग दुरुस्ती करण्यासाठी लागला. त्यानंतर 2007 मध्ये हि रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाली. नेरळ-माथेरान प्रमाणेच अमन लॉज ते माथेरान दरम्यन हि आता शटल सेवा सुरु झाली आहे.
    ——————————————————————-

 

 

पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र बिंदू …… मिनी ट्रेन

माथेरान म्हटलं कि सर्व प्रथम पर्यटकांच्या डोळ्या समोर उभी राहते ती म्हणजे मिनी ट्रेन. सह्याद्रीच्या पर्वत रांगातून झुकझुक करत मार्ग काढत जाणाऱ्या या मिनी ट्रेनचे कुतूहल बच्चे कंपनी ते अबालवृद्धांपर्यंत सर्वानाच आहे. आणि मिनी ट्रेनच्या आकर्षणापोटी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने माथेरानच्या आर्थिक पर्यटनाची घडी बसविण्यास तिचे मोठी योगदान आहे.

———————————-—–

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close