आपला जिल्हा

कर्जतमधील  खुल्या नाट्यगृहाला ” राम गणेश गडकरी ” यांचे नांव द्यावे 


कर्जतमधील  खुल्या नाट्यगृहाला ” राम गणेश गडकरी ” यांचे नांव द्यावे 

कर्जत विजय डेरवणकर 

कर्जत     नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  कर्जत शहरातील आमराई येथे खुले नाट्यगृह नव्याने उभारण्यात येत आहे तरी या नाट्यगृहाला राम गणेश गडकरी यांचे नाव द्यावे अशी मागणी साहित्यिक दिलीप गडकरी यांनी केली आहे

                     कर्जत नगरपालिकेने 1995 मध्ये युडीआरसी योजने अंतर्गत खुल्या नाट्यगृहाचे काम सुरु केले .52 लाख रुपये खर्च अपेक्षित होता त्यापैकी कर्जत नगरपालिकेने यूडीआरसी कडून 22 लाख रुपये कर्ज घेतले 95 टक्के काम झाल्या नंतर अद्याप ते तशाच अवस्थेत पडून होते .शासनाने अनुदान म्हणून दिलेले  तीस लाख रुपये तर पाण्यांत गेलेच परंतु कर्जतच्या नागरिकांनी भरलेल्या करातून बावीस लाख रुपये कर्ज आणी त्यावर व्याजही फुकट गेले असे वाटत होते परंतु  याबाबत माध्यमांनी , नाट्यरसिकांनी  पाठपुरावा केल्यामुळे मागील काळात या नाट्यगृहाचे काम  नव्याने हाती घेण्यात आले आहे .
23 जानेवारी 2021 पुर्वी नाट्यगृहाचे काम पूर्ण करून ते सुरु करावे .नाटककार राम गणेश गडकरी यांची 23 जानेवारी 2021 रोजी 102 वी  पुण्यतिथी आहे .कर्जत शहरात राम गणेश गडकरी यांचे वास्तव्य होते ,कर्जतच्या शाळेत त्यांच्या मराठी शिक्षणाचा पाया घातला गेला त्याची दखल घेऊन  नगरपालिकेने हया खुल्या नाट्यगृहाला “राम गणेश गडकरी नाट्यगृह “असे नांव द्यावे  अशी मागणी साहित्यिक दिलीप प्रभाकर गडकरी यांनी केली आहे.
—————————————

चौकटीतील मजकूर …
कर्जत शहरातील आमराई येथे खुले नाट्य गृह आणि आमराई क्रीडांगण विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडला होता  . या कामासाठी सुमारे 4 कोटी 97 लाख 55 हजार निधी खर्च केला जाणार आहे .
—————————————-

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close