ताज्या घडामोडी

अन्यथा CITU कामगार संघटनेच्या वतीने ऐन दिवाळीत आंदोलन करण्यात येईल* पोलीस टाईम्स प्रतिनिधी. आफरोज अत्तार

अन्यथा CITU कामगार संघटनेच्या वतीने ऐन दिवाळीत आंदोलन करण्यात येईल*

पोलीस टाईम्स प्रतिनिधी. आफरोज अत्तार

दि 2 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता मनमाड नगरपरिषदेतील कामगार संघटनेच्या वतीने *दिपावली निमित्त देय मागण्याचे निवेदन नगराध्यक्ष सो. मुख्याधिकारी सो* यांना देण्यात आले त्या बद्दल कामगार संघटनेच्या प्रतीनिधी ची बैठक बोलावण्यात आली होती यात (1)7 व्या वेतन आयोगाचा 1 ला हप्ता प्वली सणानिमित सर्व कायम सेवानिवृत्त कामगारांना देण्यात यावा.
2.शासन निर्णय प्रमाणे कोवीड काळात काम करणारे कामगारांना प्रोत्साहन मानधन म्हणुन रु 1000 सर्व अधिकारी व कामगार यांना देण्यात यावे.
3.सण अॅडवानस व पगार पेन्शन दिवाळी सणा आगोदर दि.5 नोव्हेंबर पर्यंत अदा करावेत इत्यादी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.सदर बैठकीत सिटू कामगार संघटनेचे *अध्यक्ष काॅ.किशोर आहिरे* *जन.सेक्रेटरी काॅ.रामदास पगारे* *कामगार सेना अध्यक्ष नितीन पाटील. किरण आहेर. अ.भा.सफाई मजदूर काँग्रेस चे संजय बहोत.संतोष वानखेडे. तसेच *मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार मुंढे साहेब* *प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र पाटील आस्थापना प्रमुख* *श्री.शरद बोडके साहेब* *लिपीक प्रविण जोशी* इत्यादी उपस्थित होते.दिवाळी देय मागण्या बाबत बैठक आयोजित करण्यात येऊन सकारात्मक चर्चा केल्या बद्दल मुख्याधिकारी श्री.मुंढे श्री. पाटील .(ओ.एस.)आस्थापना चे श्री.बोडके प्रविण जोशी यांचे कामगार संघटनेच्या वतीने आभार मानण्यास आले. सुमारे 1 तास चाललेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या चर्चे प्रमाणे दिवाळी सणा आगोदर रक्कम अदा न झाल्यास ऐन दिवाळीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिटू कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close