ताज्या घडामोडी

उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) जिल्हा यवतमाळ च्या वतीने यवतमाळ तालुका कार्यकारणीची स्थापना आणि सत्कार समारंभ…

उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) जिल्हा यवतमाळ च्या वतीने यवतमाळ तालुका कार्यकारणीची स्थापना आणि सत्कार समारंभ…

पोलिस टाइम्स न्यूज़ नेटवर्क
विशेष प्रतिनिधी/वासीक शेख

यवतमाळ, दि.२ : उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) जिल्हा यवतमाळ च्या वतीने यवतमाळ तालुका कार्यकारणीची स्थापना करण्यासाठी मंगळवार दिनांक 3 नोवेंबर 2020 रोजी सकाळी दहा वाजता उर्दू हायस्कूल पोबरु ले आउट नागपुर रोड यवतमाळ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच नुकतेच इंग्रजी भाषेत पीएचडी झालेले व नेट-सेट उत्तीर्ण डॉ.रिज़वान अहेमद खान कशफी सर आणि श्री वासीक जुबेर शेख (जिल्हा अध्यक्ष,राष्ट्रीय मुस्लिम सेना तसेच म-मराठी,एस एम न्यूज़,विदर्भ वार्ता,पोलिस वाला,पोलिस टाइम्स न्यूज़ पोर्टल चे यवतमाळ विशेष प्रतिनिधी आणि लोकविधान न्यूज़ चैनल चे मुख्य संपादक) यांच्या सत्कार ठेवण्यात आला आहे.

यूटीए च्या तमाम जिल्हा पदाधिकारी आणि सदस्यांना विनंती करण्यात येते की आपण या सभेला उपस्थित राहून या सभेला यशस्वी करावे असे आवाहन यूटीए चे विभागीय अध्यक्ष गाजी जा़हेरोश सर,व यूटीए चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सलीम खान सर यांनी केले.असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख खालिद तगाले सर यांनी कळविले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close